• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • काय? आता Fart मुळेही Covid-19 चा धोका! ढुसकी सोडली तरी पसरू शकतो Corona?

काय? आता Fart मुळेही Covid-19 चा धोका! ढुसकी सोडली तरी पसरू शकतो Corona?

फार्टमुळे (Fart) कोरोना पसरू शकतो, असा दावा मंत्र्यांनी केला आहे.

 • Share this:
  ब्रिटन, 26 जुलै: कोरोनाव्हायरस (Coronavirus) असलेल्या पृष्ठभागाशी संपर्कात आल्यानंतर किंवा  शिंकण्यातून, खोकण्यातून हवेच्या माध्यमातून पसरतो, हे आपणा सर्वांना माहितीच आहे. पण आता तर कोविड-19 (Covid-19) फार्टमधून (Fart) म्हणजे पादण्यातूनही (Farting) पसरतो (Coronavirus spread by farting) असा दावा केला जातो आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ब्रिटनमधील काही मंत्र्यांनी कोरोना हा पोटातील गॅसमधून पसरू शकतो, अशी चिंता व्यक्त केली आहे. एखाद्या कोरोना संक्रमित व्यक्तीने फार्ट केलं तर त्यातून त्या पोटातील गॅसमार्फत हवेत कोरोनाव्हायरस पसरू शकतो, याकडे मंत्र्यांनी लक्ष वेधलं आहे. मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार एका मंत्र्याने टेलिग्राफशी बोलताना सांगितलं की,  एका शौचालयातून दोन व्यक्तींमध्ये जीनोमिकल-लिंक्ड ट्रेसिंग कनेक्शन असल्याचं प्रमाण ऑस्ट्रेलियात मिळालं आहे. हे वाचा - 'Corona Vaccine न घेणं ही माझी सर्वात मोठी चूक'; कोरोनाशी लढणाऱ्या रुग्णाची खंत ब्रिटनमधील सरकारी वैज्ञानिकांनी याबाबत कोणत्याही जर्नलमध्ये माहिती दिलेली नाही. पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्या प्रवक्त्याने सांगितलं की, कोरोनाव्हायरस फार्टमुळे पसरू शकतो, या दाव्याबाबत आपल्याला माहिती नाही. आपण वैज्ञानिक पुराव्यांची समीक्षा करू. काही संशोधनानुसार कोरोना संक्रमित व्यक्तीच्या मलामध्ये कोरोनाव्हायरस असू शकतो पण तो त्या व्यक्तीच्या फार्टमधून पसरू शकतो, याबाबत अद्याप वैज्ञानिकदृष्ट्या पुष्टी झालेली नाही. हे वाचा - Candida auris चे रुग्ण आढळल्यानं खळबळ; उपचारही उपलब्ध नसल्यानं चिंता वाढली टेनेसीमधील वेंडरबिल्ट युनिव्हर्सिटीतील संसर्गजन्य आजाराच्या राष्ट्रीय फाऊंडेशनचे डॉ. विलियम शेफनर यांनी युएएस टुडेला सांगितलं की, फार्टच्या माध्यमातून कोरोना संसर्गाबाबत अद्याप कोणतंही प्रमाण नाही. हे अशक्य आहे.
  Published by:Priya Lad
  First published: