मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

तुम्हालाही असतील ‘या’ 6 वाईट सवयी तर, वेळीच बदल करा; घरात पसरेल घाणीचं साम्राज्य

तुम्हालाही असतील ‘या’ 6 वाईट सवयी तर, वेळीच बदल करा; घरात पसरेल घाणीचं साम्राज्य

कित्येक वेळा साफसफाईसाठी वापरला जाणारा मॉप इतका घाणेरडा असतो की, साफसफाईपेक्षा घाणच पसरते.

कित्येक वेळा साफसफाईसाठी वापरला जाणारा मॉप इतका घाणेरडा असतो की, साफसफाईपेक्षा घाणच पसरते.

कधीकधी आपल्यामध्ये आळशीपणा (Laziness) इतका वाढतो की, घराच्या स्वच्छतेकडे (Home Cleaning) जास्त दुर्लक्ष होतं. घरात घाण झाली तर, ती एकचवेळी साफ करणं जास्त कठीण असतं.

  • Published by:  News18 Desk

दिल्ली,16 ऑगस्ट : सगळ्यांनाच कामात शॉर्टकट (Shortcut) हवा असतो. याच वृत्तीमुळे आपल्यामध्ये अवगुण वाढायला लागतात. अस्वच्छता (Uncleanliness) हा देखील असाच एक गुण आहे. ऑफिस वर्क (Office Work) किंवा कंटाळा म्हणून केलेली टाळाटाळ यामुळे घरात घाण,कचरा,दुर्गंध वाढते. त्यानंतर घरात फार वाईट अवस्था झाल्यावर आपली चूक लक्षात येते आणि आपण स्वच्छतेसाठी (Cleaning) धावाधाव करायला लागतो. घर खराब (Dirty House) झालं की, आपल्याबरोबर घरातल्या माणसांनाही याचा त्रास होतो. त्यामुळे आपल्याला लागलेली आळशीपणाची (Lazy) सवय बदलायची असेल तर, स्वत:त काही बदल करायला हवेत.

खराब कापडाचा वापर

कित्येक वेळा साफसफाईसाठी वापरला जाणारा मॉप इतका घाणेरडा असतो की, साफसफाईपेक्षा घाणच पसरते. त्यामुळे मॉप वापरण्याआधी साबणाने पूर्ण स्वच्छ करून वापरावा. शिवाय वापर झाल्यानंतर स्वच्छ करून उन्हात वळवा. म्हणजे पुन्हापुन्हा वापरुनही स्वच्छ राहील आणि घरात बॅक्टेरिया वाढणार नाहीत.

एकाच डिसइंफेक्‍ट वाइप वापरणं

घर स्वच्छ करण्यासाठी डिसइंफेक्‍ट वाइप (Disinfect Wipe)अतिशय उपयोगी ठरतात. त्यांचा वापर करुन घर लवकर स्वच्छ करता येतं. पण, बचतीच्या नादात एकाच डिसइंफेक्‍ट वाइपने घर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करणं चुकीचं आहे. यामुळे एका ठिकाणचे जिवाणू इतर ठिकाणी पसरतात. घरात एखादया ठिकाणी जमलेले बॅक्टेरिया घरात पसरल्याने रोग कमी होण्याऐवजी वाढतात.

(हरहुन्नरी IAS ऑफिसर प्रियांका शुक्ला; झोपडपट्टीतल्या महिलेमुळे बदललं आयुष्य)

किचन सिंकमध्ये वापरलेली भांडी ठेवणं

सिंकमधील खरकट्या भांड्यांवर बॅक्टेरिया वाढायला जास्त वेळ लागत नाही. एवढेच नाही तर यामुळे झुरळं, मुंग्या असे किटक वाढतात. त्यामुळे घरातील सर्व माणसांना भांडी सिंकमध्ये ठेवण्याऐवजी धुण्याची सवय लावली पाहिजे. घर बॅक्टेरिया फ्री ठेवण्यासाठी ही सवय खूप महत्त्वाची आहे.

क्‍लिनिंग प्रोडक्‍ट चुकीच्या पद्धतीने साठवणं

कित्येक वेळा क्‍लिनिंग प्रोडक्‍ट जागेवर ठेवलेले नसतात. त्यामुळे शोधण्यासाठी बराच वेळ लागतो. नेहमी किचन क्लिनिंग प्रोडक्ट बेसिंकच्याखाली साठवून ठेवल्यास पटकन सापडतात. बाथरूम सिंकखाली बाथरूम क्लिनर आणि बाल्कनीवर किंवा स्टोअरमध्ये रूम क्लिनर ठेवावीत. लक्षात ठेवा की, स्वयंपाकघराचा मॉप बाथरूमसाठी किंवा बाथरुमचा मॉप स्वयंपाक घरासाठी वापरू नये.

(दररोज चहात ‘हा’ पदार्थ घालता तरी माहिती नाहीत फायदे? मग नक्की वाचा…)

प्रोडक्ट वापरण्यापूर्वी सूचना वाचा

बरेच लोक बाजारातून विकत आणलेले क्लिनिंग प्रोडक्ट इच्छेनुसार वापरायला सुरवात करतात. याचे वाईट परिणाम होऊ शकतात. कधीकधी प्रिकॉर्शनची माहिती नसल्याने त्याची हातांना अ‍ॅलर्जी होऊ शकते. त्यामुळे कोणतंही डिटर्जंट किंवा क्लिनिंग प्रोडक्ट खरेदी करताना सुचना आधी नीट वाचा.

(हे पदार्थ वाढवतील कोरोनाचा धोका; बचावासाठी बदला खाण्या-पिण्याच्या सवयी)

जास्त घाण झाल्यावर जाग येणं

घर खूप खराब झाल्याशिवाय काहींना ते स्वच्छ करण्याची जाणीव होत नाही. काहींना ठराविक वेळीच घर साफ करायला आवडतं. त्यामुळे काम जास्त वाढतं. त्याऐवजी घरातील कचरा, घाण वेळच्यावेळी साफ करायची सवय लावा. त्यामुळे घर नेहमी स्वच्छ दिसेल. किचन, बाथरुन रोज साफ करायला हवं.

First published:

Tags: Easy hack, Home-decor, Lifestyle