मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कुटुंब, करिअर, पॅशनचा ताळमेळ साधत उत्तुंग भरारी; Classic Mrs. Grand Universe India 2021 ठरलेल्या डॉ. शशिलेखा नायर

कुटुंब, करिअर, पॅशनचा ताळमेळ साधत उत्तुंग भरारी; Classic Mrs. Grand Universe India 2021 ठरलेल्या डॉ. शशिलेखा नायर

डॉ. शशिलेखा नायर यांनी 2018 मध्ये मिसेस इंडिया केरळ जिंकली आहे.

डॉ. शशिलेखा नायर यांनी 2018 मध्ये मिसेस इंडिया केरळ जिंकली आहे.

क्लासिक मिसेस ग्रँड युनिव्हर्स इंडिया 2021 (Classic Mrs. Grand Universe India 2021) किताब मिळवणाऱ्या डॉ. शशिलेखा नायर (Dr. Shashilekha Nair) मिसेस ग्रँड युनिव्हर्स 2021 पीजेंट (Mrs. Grand Universe 2021) साठी भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

तिरुअनंतपुरम, 29 मे : एक महिला आपलं करियर (Career) सांभाळून किती क्षेत्रात भरारी घेऊ शकते याचं जिवंत उदाहरण आहेत डॉ. शशिलेखा नायर (Dr.Shashilekha Nair). केरळच्या शशिकला यांना क्लासिक मिसेस ग्रँड युनिव्हर्स इंडिया 2021 (Classic Mrs. Grand Universe India 2021) हा पुरस्कार मिळाला आहे. आता त्या फिलिपीन्समध्ये होणाऱ्या मिसेस ग्रँड युनिव्हर्स 2021 पीजेंट (Mrs. Grand Universe 2021) साठी भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहेत.

दोन मुलांची आई असेल्या डॉ. शशिलेखा भरतनाट्यम डान्सर (Bharatanatyam Dancer) आणि  एक उद्योजिका आहेत. त्या तिरुअनंतपुरम (Thiruvananthapuram) मधील आयक्यू मॅट्रिक्स इन्फोवेज सोल्युशनच्या (IQ Matrix Infowage Solutions) व्यवस्थापकीय संचालिका (Managing Directorआहेत. आवड असल्याने त्यांनी भरनाट्यमचं प्रशिक्षण घेतलं. त्यासोबत आपल्या कामातही खंड पडू दिला नाही. त्यांनी आपलं करियर आणि पॅशनचा ताळमेळ घालतानाच आपल्या जबदाऱ्याही यशस्वीपणे पार पाडलेल्या आहेत.

(भारतातील सर्वसाधारण नोकरी करणारे तीन तरुण क्रिप्टोकरन्सीमुळे झाले अब्जाधीश)

केरळमध्ये नुकत्याच पार पडलेल्या मिसेस ग्रँड युनिव्हर्स 2021च्या व्हर्च्युअल कार्यक्रमात क्लासिक मिसेस ग्रँड युनिव्हर्स इंडिया 2021 पुरस्काराने डॉ. शशिलेखा नायर यांना गौरवण्यात आलं आहे. त्यामुळे आता त्या फिलिपीन्स (Philippines) मधील मनिलाला (Manila) होणाऱ्या मिसेस ग्रँड युनिव्हर्स 2021 साठी भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहेत. डॉ. शशिलेखा नायर यांनी 2018 मध्ये मिसेस इंडिया केरळ आणि मिसेस एशिया इंटरनॅश्नल मोस्ट चार्मिंग स्पर्धाही जिंकली आहे. दोन वर्षानंतर पुन्हा एकदा या स्पर्धेमधून त्यांना जगभरातील लोकांना भेटण्याची संधी मिळाली आहे. डॉ. शशिकला नायर यांनी फिलिपीन्समध्ये होणाऱ्या स्पर्धेतही भारताचा झेंडा फडकवणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

(प्रयत्नांती परमेश्वर !Amul कंपनीच्या ड्रायव्हरचा मुलगा बनला डेअरी कंपनीत अधिकारी)

डॉ.शशिलेखा यांना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 2020 ला नेशन्स इंटरनॅशनल ह्युमन राइट्स असोसिएशनने (SNIHRA) गौरवलं आहे तर, केरळ सरकारनेही त्यांचा यशस्वी महिला म्हणून महिला दिनी सत्कार केला आहे.

First published:

Tags: Inspiration, Inspiring story, Kerala, Success, Success story, Woman