• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • Success Story: Amul च्या ड्रायव्हरचा मुलगा झाला IIM मधून MBA आणि डेअरी कंपनीत अधिकारी

Success Story: Amul च्या ड्रायव्हरचा मुलगा झाला IIM मधून MBA आणि डेअरी कंपनीत अधिकारी

हितेश यांचे वडिल पंकज सिंह अमूल कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करतात.

हितेश यांचे वडिल पंकज सिंह अमूल कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करतात.

वडील अमूलसारख्या मोठ्या डेअरी कंपनीसाठी ड्रायव्हरचं काम करायचे. एक दिवस अशाच मोठ्या डेअरी कंपनीत साहेब होईन, ही हितेशची इच्छा त्याने कशी पूर्ण केली वाचा.. Success Story

 • Share this:
  दिल्ली, 24 मे : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट,अहमदाबाद (IIM Ahmedabad) इथे नुकत्याच झालेल्या प्लेसमेंट दरम्यान, 24 वर्षीय हितेश सिंग (Hitesh Singh)ची कंट्री डिलाईट (Country Delight) मध्ये असोसिएट मॅनेजर (नवीन उत्पादन) पदासाठी निवड झाली आहे. हितेशला नेहमीच डेअरी क्षेत्रात काम कराण्याची इच्छा होता. हितेश यांचे वडील पंकज सिंह अमूल कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करतात. त्यामुळे हितेश आणि त्याच्या वडीलांसाठी एखादं स्वप्न सत्यात उतरण्यासारखी ही घटना आहे. ( OMG! पाचशे, हजार नाही तर तब्बल दीड लाख रुपये एक किलो; सोन्यापेक्षाही महाग मशरूम) गुजरात सहकारी दूध विपणन महासंघ लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक आरएसएस सोधी यांना हितेश आपलं रोडमॉडेल मानतात. हितेश यांनी गुजराती माध्यमिक शाळेत शिक्षण घेतल्यानंतर फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथ्स विषयात 97.% गुण प्राप्त केले. शालेय काळापासूनच शिष्यवृत्तीच्या मदतीने शिक्षण घेतलेल्या हितेश यांनी कधीही ट्युशन लावली नाही. त्यांनी एसएम सायन्स कॉलेज ऑफ डेअरी सायन्स (SM Science College of Dairy Science)मधून डेअरी टेक्नॉलॉजीमध्ये बीटेकमध्ये अव्वल स्थान प्राप्त केलं आहे. (White Fungus:ब्लॅक फंगसपेक्षा आहे धोकादायक, बिहारमध्ये 4 रुग्ण; असा करा बचाव) हितेशचे वडील पकंज सिंग हे संपूर्ण कुटूंबासह बिहारहून गुजरातमध्ये आणंद मध्ये स्थायिक झाले. सुरुवातीच्या काळात,त्यांनी सिक्युरिटी गार्ड म्हणून काम केलं, तेव्हा त्यांना 600 रुपये पगार मिळत होता. त्यानंतर त्यांनी ड्राईव्हिंग शिकून 2007 मध्ये नोकरीला सुरुवात केली. (Covishield च्या तिसऱ्या बूस्टर डोसनं कोरोनाच्या कुठल्याही स्ट्रेनपासून बचाव) आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे हितेशने कर्ज घेऊन आपले शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी आयआयएम अहमदाबाद (IIM Ahmedabad) येथून फूड अँड ऍग्री बिझिनेस मॅनेजमेन्ट (Food and Agri Business Management) मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं ज्यासाठी त्यांना स्कॉलरशिप मिळाली.
  Published by:News18 Desk
  First published: