मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

भारतातील सर्वसाधारण नोकरी करणारे 3 तरुण क्रिप्टोकरन्सीमुळे झाले अब्जाधीश; कसा होता त्यांचा प्रवास?

भारतातील सर्वसाधारण नोकरी करणारे 3 तरुण क्रिप्टोकरन्सीमुळे झाले अब्जाधीश; कसा होता त्यांचा प्रवास?

सध्या जगभरात कधी चीनमुळे तर कधी एलन मस्क यांच्यामुळे क्रिप्टोकरन्सीची (Cryptocurrency) जोरदार चर्चा सुरु आहे. कारण काहीही असो जगभरातील लोकांच्या तोंडी एकच नाव आहे आणि ते म्हणजे क्रिप्टोकरन्सी.

सध्या जगभरात कधी चीनमुळे तर कधी एलन मस्क यांच्यामुळे क्रिप्टोकरन्सीची (Cryptocurrency) जोरदार चर्चा सुरु आहे. कारण काहीही असो जगभरातील लोकांच्या तोंडी एकच नाव आहे आणि ते म्हणजे क्रिप्टोकरन्सी.

सध्या जगभरात कधी चीनमुळे तर कधी एलन मस्क यांच्यामुळे क्रिप्टोकरन्सीची (Cryptocurrency) जोरदार चर्चा सुरु आहे. कारण काहीही असो जगभरातील लोकांच्या तोंडी एकच नाव आहे आणि ते म्हणजे क्रिप्टोकरन्सी.

नवी दिल्ली, 29 मे : सध्या जगभरात कधी चीनमुळे तर कधी एलन मस्क यांच्यामुळे क्रिप्टोकरन्सीची (Cryptocurrency) जोरदार चर्चा सुरु आहे. कारण काहीही असो जगभरातील लोकांच्या तोंडी एकच नाव आहे आणि ते म्हणजे क्रिप्टोकरन्सी. भारतात देखील क्रिप्टोकरन्सीची जोरदार चर्चा आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच 3 भारतीयांविषयी सांगणार आहोत की ज्यांनी क्रिप्टोच्या जगात अत्यंत कमी वेळात आपलं नाव कमावलं असून ते अब्जाधीश देखील बनले आहेत. जयंती कानन, संदीप नेलवाल आणि अनुराग अर्जुन अशी या अब्जाधीशांची (Billionaire) नावं आहेत.

ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म पॉलिगॉनचे आहेत सहसंस्थापक

हे तिघे ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म (Blockchain Platform) पॉलिगॉनचे (Polygon) सहसंस्थापक आहेत. पॉलिगॉन यापूर्वी मॅटीक (Matic) या नावाने ओळखला जात होता. याची स्थापना 2017 मध्ये झाली. पॉलिगॉन इथेरियम ब्लॉकचेनवर आधारित आहे. याच्या सहाय्याने विकेंद्रीत ॲप्सची निर्मिती केली जाते. जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या क्रिप्टोकरन्सी इथेरियमवरील उच्च शुल्क आणि संथ व्यवहाराची समस्या सोडवण्यासाठी हे तयार करण्यात आले आहे.

इथेरियम स्केलिंग आणि पायाभूत विकासाचे केले जाते काम

पॉलिगॉन प्लॅटफॉर्मच्या मदतीने सोप्या पध्दतीने इथेरियम स्केलिंग आणि पायाभूत विकासाचे काम केले जाते. युझर्स याच्या मदतीने ॲप देखील तयार करु शकतात. पॉलिगॉनची मूळ कंपनी असलेल्या मॅटिकचा मार्केट कॅप 2019 च्या तुलनेत 26 दशलक्ष डॉलरने वाढत 14 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. या क्रिप्टोकरन्सीत त्यांची भागीदारी 4 ते 5 टक्के आहे. सध्याच्या मुल्यांकनाच्या आधारे हे भारतातील पहिले क्रिप्टो अब्जाधीश आहेत. क्रिप्टो जगतातील डेटाची पडताळणी करणं अवघड आहे. त्यामुळे अशी बरीच लोकं असू शकतात की ज्यांनी क्रिप्टोच्या माध्यमातून लाखो रुपये कमवले आहेत परंतु, त्यांची माहिती सार्वजनिक झालेली नाही.

हे ही वाचा-5 वर्षांत 3 लाखांचं मूल्य चौपटीनं वाढलं, अशी फायदेशीर गुंतवणूक कुठे कराल?

प्रवास कसा सुरु झाला

लाईव्ह मिंटच्या वृत्तानुसार, संदीप नेलवाल यांनी सांगितले की त्यांच्या कंपनीने कोरोना काळात मदतीकरिता आतापर्यंत 1 अब्ज डॉलरपेक्षाही जास्त क्रिप्टो फंड जमवला आहे. मी मूळचा दिल्लीतील आहे. माझे दोन अन्य सहसंस्थापक सहकारी मुंबई आणि अहमदाबाद येथील आहेत. आमचे मुख्य कार्यालय बेंगळुरुमध्ये आहे. मी आणि संदीपने इंजिनियरिंग आणि कॉम्प्युटर सायन्स या विषयात शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर मी 2 वर्षे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून एका कंपनीत नोकरी केली. त्यानंतर एमबीए केलं आणि आयटीमध्ये स्पेशलायझेशन केलं. त्यानंतर मी डेलॉईटमध्ये काम केलं. त्यानंतर पुन्हा ई-कॉमर्स कंपनी वेलस्पून (येथे मी सीटीओ होतो) मध्ये नोकरी केली. त्यानंतर मी फ्लिपकार्ट प्रमाणे एक वेबसाईट लॉन्च केली.

ब्लॉकचेनसारख्या तंत्राविषयी घेतली माहिती

संदीप यांनी पुढे सांगितले की माझा उद्योग-व्यवसाय माझ्या अपेक्षेप्रमाणे मोठा नव्हता. त्यानंतर मी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) आणि ब्लॉकचेनसारख्या तंत्राविषयी अध्ययन सुरु केलं. त्यानंतर मी पुन्हा प्रोग्रामिंग सुरु केलं. यादरम्यान माझी ओळख जयंती कानानी आणि अनुराग अर्जुन यांच्याशी झाली. कनानी हे कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअर आहेत तसेच ते हाउसिंग डॉट कॉम (Housing Dot Com) सोबत डेटा सायंटिस्ट म्हणून काम करीत होते. त्यानंतर जागतिक पेमेंट सिस्टिमसाठी त्यांनी गेम ऑफ थ्रोन्ससाठी एक वायदा मार्केटसारखे काही ॲप्स तयार करण्याचा प्रयत्न केला. अनुराग अर्जुन हे एक सिरिअल उद्योजक आहेत. ते आयआरआयएससोबत काम करतात. हे केंद्रीय बॅंकांसारख्या संस्थांमध्ये वापरले जाणारे एक सॉफ्टवेअर आहे. यापूर्वी अर्जुन यांनी जीएसटीशी निगडीत एक स्टार्टअप सुरु केलं होतं.

आमच्यापैकी चौथे सहसंस्थापक मिहेलो बेजोलिक हे मूळचे सर्बियाचे आहेत. ते मॅटिकसारख्या एका प्रकल्पात काम करीत होते. मॅटिकचा पॉलिगॉनमध्ये रिब्रँड करताना ते आमच्याशी जोडले गेले. अशा पध्दतीने आमचा व्यवसाय सुरु झाला आणि पुढे तो वाढत गेल्याचे संदीप नेलवाल यांनी सांगितले.

First published:

Tags: Positive story, Young boy