मुंबई, 29 ऑक्टोबर : शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, असं आपल्याकडे नेहमी म्हटलं जातं. त्याला अनेक कारणं आहेत. कायद्याची माहिती नसणे, कोर्टकचेऱ्या करण्यात येणारा खर्च आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे न्याय मिळण्यासाठी लागणारा मोठा कालावधी. पण, हे मत प्रत्येकवेळी बरोबरच असेल असं नाही. कारण, अनेक गोष्टी तुम्ही कोर्टाची पायरी न चढताच मिळवू शकतात. फक्त त्यासाठी तुम्हाला कायद्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. योग्य माहिती असल्यास तुम्ही अगदी रुपयाही खर्च न करता कोर्टातून न्याय मिळवू शकता. आणि हिच माहिती देण्यासाठी आम्ही #कायद्याचंबोलाहे सदर घेऊन आलो आहोत.
कुणाची फसवणूक, कुणाचा छळ, कुणाला मानसिक त्रास, कुणाच्या वैयक्तित आयुष्यात ढवळाढवळ, कुणाच्या हक्कांवर गदा, प्रॉपर्टीचे वाद, कौटुंबिक कलह.. कुठल्याही विषयासंदर्भात कायदा काय सांगतो? शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात, पण अनेकांनी ती चढून आपला हक्क मिळवला आहे. या कायद्याच्या गोष्टी सोप्या करून सांगणारी नवी सीरिज #कायद्याचंबोला. कायद्याच्या अभ्यासक वकिलांकडूनच तुम्हाला मिळेल अगदी खात्रीशीर माहिती. तुम्हालाही कुठल्या विषयी कायदेशीर शंका असतील तर Rahul.Punde@nw18.com या मेलवर आम्हाला सांगा.
तुमच्याविरुद्ध कोणी खोटी FIR दाखल केली तर? घाबरू नका रद्द करण्याचा हा आहे मार्ग
जर कोणत्याही व्यक्तीविरोधात खोटी एफआयआर दाखल केली तर कोर्टात जाऊन ती रद्द करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
लग्नाशिवाय एकत्र राहिल्यानंतर मिळतात बायकोचे अधिकार, पण 'या' अटींवर
कोणतेही दोन लोक लिव्ह-इनमध्ये राहू शकतात. कायद्याने अशा नात्याला मान्यता आहे. मात्र, याला काही नियम आहेत. त्याचे उल्लंघन होत असेल तर तुम्हाला कायद्याचं संरक्षण मिळत नाही. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
कोर्ट मॅरेज कसं करतात? यात घटस्फोट, उत्तराधिकार, वारसाहक्काचं काय होतं?
हा विवाह कायदा बनवण्याचा उद्देश आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांना मान्यता देणे हा आहे. मात्र, यात घटस्फोट, उत्तराधिकार, वारसाहक्क यासंदर्भात नियम वेगळे आहेत. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
जोडीदार घटस्फोट देत नाहीये पण तुम्हाला हवाय; त्याच्या संमतीशिवाय अशी मिळवा सुटका
एखाद्या व्यक्तीला आपल्या जोडीदाराच्या जाचातून मुक्त व्हायचं असतं. मात्र, जोडीदार घटस्फोट देण्यास नकार देतो. अशावेळी कसा त्याच्या संमतीशिवाय घटस्फोट कसा मिळवायचा? सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
घटस्फोट मिळाल्यानंतर पुन्हा बोहल्यावर चढायची घाई? नियम वाचा नाहीतर जाल तुरुंगात
घटस्फोट घेतल्यानंतर लगेच दुसरा विवाह करता येतो. असा अनेकांचा समज आहे. मात्र, परिस्थिती तुमच्या केसवर अवलंबून आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. (कायदे वेळोवेळी बदलत असतात. वरील माहिती ही सध्याच्या कायद्यानुसार आहे. त्यामुळे कोणतीही कायदेशीर कारवाई करण्याअगोदर कायदेतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
(लेखिका कायद्याच्या अभ्यासक असून पुण्यात कायदेशीर सल्लागार आणि पुणे जिल्हा न्यायालयात वकील म्हणूनही कार्यरत आहेत.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.