मुंबई, 14 जून : पुशअप्स (Push ups) म्हटलं की हात आणि पायांचा वापर आलाच. मात्र अभिनेत्री कतरिना कैफने (Katrina kaif) जमिनीवर हात न टेकवता पुशअप्स मारले आहेत. कतरिनाच्या पुशअप्सचा व्हिडीओ सोशल मीडियावरही (social media) चांगलाच व्हायरल (viral) होतो आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ कतरिना कैफ फॅन पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये कतरिना डेडिकेशनने वर्कआऊट करताना दिसते आहे. या व्हिडीओत ती प्रकारे पुशअप्स करताना दिसते.
सुरुवातीला कतरिना आपले दोन्ही हात जमिनीवर टेकवून पुशअप्स मारते. त्यानंतर ती एका हातानेच पुशप्स करताना दिसते आणि शेवटी तर ती दोन्ही हात जमिनीवर न टेकवता पुशअप्स करताना दिसते. हे कसं काय शक्य आहे? कतरिनाने हे नेमकं केलं तरी कसं? असा प्रश्न हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला पडला असेल ना?
हे वाचा - ‘मिस वर्ल्ड झालीस म्हणून तू अभिनेत्री होशील?’ प्रियांकावर का ओरडला कोरिओग्राफर
व्हिडीओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळेल. खरंतर व्हिडीओचा शेवट पाहिल्यानंतर तुम्हाला हसूही आवरणार नाही. कतरिना एका लांब प्लायवूडवर आहे, ज्याला मध्येच आधार देण्यात आलेला आहे आणि त्याच्या दुसऱ्या टोकाला एक व्यक्ती उभी आहे. ज्यामुळे सी-सॉप्रमाणे या प्लायवूडची हालचाल होते आहे आणि कतरिता हात न टेकवता पुशअप्स मारू शकते.
हे वाचा - अनलॉक 1 मध्ये बॉयफ्रेंडसोबत बाइकवरून फिरताना दिसली श्रद्धा कपूर, Video Viral
तसा कतरिनाचा हा व्हिडीओ मार्चमधील आहे. मात्र तो पुन्हा व्हायरल होऊ लागला आहे. दरम्यान लॉकडाऊनमध्ये कतरिना सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह झाली आहे. आपल्या सोशल मीडियावर ती असे बरेच फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
संकलन, संपादन - प्रिया लाड
हे वाचा - कोरोना पॉझिटिव्ह असूनही मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री मोहिना कुमारी परतली घरी