मुंबई, 13 जून : श्रद्धा कपूर ही बॉलिवूडची अशी अभिनेत्री आहे जी सिनेमासोबत सोशल मीडियावरही सक्रीय आहे . श्रद्धा नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते आणि अनेकदा तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. पण आता श्रद्धा एका वेगळ्या कारणाननं चर्चेत आली आहे. श्रद्धाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत स्कुटीवर बसून फिरताना दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ हॉट्सअप बॉलिवूडनं त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. ज्यात श्रद्धा ब्लॅक कलरचं टी-शर्ट आणि ट्रॅक पँट घातली आहे आणि ती कथित बॉयफ्रेंड रोहन श्रेष्ठासोबत सोबत स्कुटीवरून कुठेतरी जाताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. आतापर्यंत अनेकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. याशिवाय श्रद्धाचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यात ती बाहेर वडापाव खाताना दिसत आहे.
श्रद्धा कपूरच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर तिचा ‘बागी 3’ हा सिनेमा लॉकडाऊनच्या अगोदर रिलीज झाला होता. या सिनेमात तिने टायगर श्रॉफसोबत स्क्रीन शेअर केली होती. याशिवाय 2020च्या सुरुवातीला तिचा स्ट्रीट डान्सर हा सिनेमा देखील रिलीज झाला होता. या व्यतिरिक्त श्रद्धाकडे लव्ह रंजन याचा एक सिनेमा आहे ज्यात ती रणबीर कपूर सोबत दिसणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.