सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये प्रियांका सांगते, अंदाजच्या या गाण्याच्या शूटिंगसाठी मी साउथ आफ्रिकेला गेले होते. हे एक रोमँटिक गाणं होतं. राजू खान कोरिओग्राफ करत होते. 40 रिटेक होऊनही मला नीट डान्स करता येत नव्हता. हे पाहिल्यावर राजू खान नाराज झाले, त्यांनी माइक जागेवरच आपटला आणि म्हणाले, ‘तू मिस वर्ल्ड झालीस म्हणजे तू अभिनेत्री होशील असं वाटतं का तुला? पहिलं जा, डान्स शिक आणि पुन्हा येऊन परफॉर्म कर.’ अॅडल्ट स्टार झालेल्या या सुपर कार रेसरने महिन्याभरात कमावले 90000 डॉलर प्रियांका पुढे म्हणाली, त्यावेळी अक्षयची बायको ट्विंकल प्रेग्नन्ट होती. ज्याचा फायदा मला झाला. शूटिंग काही दिवसांसाठी थांबवण्यात आलं. त्यावेळी मला तयारी करायला वेळ मिळाला. मी पंडित वीरू कृष्णन यांच्याकडे जाऊन कथ्थक शिकायला सुरुवात केली. मी रोज 6-6 तास प्रॅक्टिस करत असे आणि जेव्हा मी पुन्हा सेटवर परतले त्यावेळी मला पूर्वी पेक्षा चांगला डान्स येत होता. रातोरात स्टार झालेल्या राणू मंडलवर आली अशी वेळ, 2 वेळेचं अन्न मिळणंही अवघड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Priyanka chopra