मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

करीना कपूरने प्रेग्नेन्सीत खाल्ले डिंकाचे लाडू; महिलांनाच नाही तर पुरुषांसाठीही डिंक लाभदायक

करीना कपूरने प्रेग्नेन्सीत खाल्ले डिंकाचे लाडू; महिलांनाच नाही तर पुरुषांसाठीही डिंक लाभदायक

 गर्भावस्थेतला आहार बाळ आणि आई दोघांसाठी महत्त्वाचा असतो.

गर्भावस्थेतला आहार बाळ आणि आई दोघांसाठी महत्त्वाचा असतो.

आयुर्वेदातही (Ayurveda) डिंक खाण्याचे फायदे सांगितलेल आहेत. डिंकाच्या लाडवांनी बाळंतिणीला दूध भरपूर येतं असं सांगतात. पुरुषांना काय फायदा आहे वाचा...

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 11 ऑगस्ट :  अभिनेत्री करीना कपूरने (Actress Kareena Kapoor) आपल्या पुस्तकात तिच्या प्रेग्नेन्सीबदद्ल (Kareena Kapoor Book About Pregnancy) माहिती सांगितली आहे. तिने गर्भावस्थेत घेतलेल्या आहाराबद्दलही  (pregnancy Diet)  सांगितलं आहे. गर्भावस्थेतला आहार बाळ आणि आई दोघांसाठी महत्त्वाचा असतो. आई जे खाते ते बाळांपर्यंत पोहचत असतं आणि त्याचा परिणाम बाळाच्या वाढीवर होत असतो.

करीना कपूर सांगते तिने गर्भधारणेच्या काळात डिंकाचे लाडू (Dinka Laddu) खाल्ले. आपल्याला हाडांच्या मजबूतीसाठी  (Bone Strength) डिंक खाण्याचे फायदे माहिती असतात. आयुर्वेदातही (Ayurveda) याचं महत्त्व सांगितलेलं आहे. पण, आपल्याकडे आईला डिलिव्हरीनंतर (Delivery) डिंकाचे लाडू दिले जातात. डिंकाचे लाडू होणाऱ्या आईने गर्भधारणेच्या काळातही प्रमाणात खाण्याने फायदा होतो. पाहुयात डिंक खाण्याचे आरोग्याला होणारे फायदे (Health Benefits).

इम्युनिटी वाढवण्यासाठी फायदेशीर

डिकांचे लाडू उष्ण असतात त्यामुळे थंडीत जास्त खाल्ले जातात. पण, इम्युनिटी वाढवण्यासाठी हे लाडू चांगले असतात. आयुर्वेदानुसार डिंकाचे लाडू खाण्याने सर्दी-खोकला होत नाही. शरीरातील व्हिटॅमीन डीची कमतरका दूर होते. डिंकाने सांध्यामध्ये वंगण वाढतं त्यामुळे सांधेदुखी कमी होते.

(‘हा’ आजार पोखरतो दात आणि हिरड्या; वेळ निघून जाण्याआधी लक्ष द्या)

बाळंतपणात खाल्ल्यास शरीर रिकव्हर होण्यासाठी फायदा होतो आणि दुधही भरपूर येतं. शरीराची झीज व जखम भरून काढण्याचे काम डिंक करतो. यामुळे पचनक्रिया सुरळीत होण्यासोबतच पोटाच्या इतर समस्या दूर होतात.

(पोटदुखीपासून हृदयरोग, डायबेटिज, कॅन्सरवरही गुणकारी; घरात हवंच हे आयुर्वेदिक औषध)

डिंकाचे लाडू करण्यासाठी तूप, गव्हाचं पिठ, गुळ किंवा साखर, डिंक आणि ड्रायफ्रुट वापरले जातात. त्यामुळे भरपूर व्हिटॅमीन्स आणि न्युट्रिशन, प्रोटीन, कॅल्शियम असतं त्यामुळे शरीरात उर्जा वाढते, हाडे मजबूत होतात. एक लाडू खाल्ला तरी शरीराला भरपूर उर्जा मिळते. हे लाडू उष्ण असल्याने थंडीत खाणं चांगलं असतं. पण, एखादा लाडू कधीही खाता येतो. पुरूषांना लैंगिक समस्या असतील तर, डिंकाचं लाडू खावेत.डिंकाचा वापर औषधासोबतच बेकरी प्रोडक्ट्स, सौंदर्य उत्पादनं, एनर्जी ड्रिंक आणि आइसक्रिम्स इत्यादींमध्ये प्रयोग करण्यात येतो.

(नका बाळगू लाज! महिलांमध्ये वाढतोय हा आजार; उपचार न केल्यास होतात दुष्परिणाम)

डिंक मध्य पूर्व, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान आणि पंजाबमधील काही भागांमध्ये आढळतो. डिंकाचा उपयोग फार पूर्वीपासून पोटातील जंत, खोकला आणि घशातील खवखव दूर करण्यासाठी वापरण्यात येतो.  भारतामध्ये डिंक मुख्यतः बाभळीच्या झाडापासून मिळवलं जातं. यामुळे पचनक्रिया सुरळीत होण्यासोबतच पोटाच्या इतर समस्या दूर होतात.

First published:

Tags: Bollywood actress, Lifestyle, Pregnancy, Pregnant woman