मुंबई, 14 जून : वडीलधाऱ्या लोकांकडून आपण अनेकदा ऐकले असेल की फाटलेले कपडे, बूट किंवा पाकीट वापरू नयेत, पण काही लोकांसाठी त्यांच्या काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. ज्यांना ते स्वतःसाठी भाग्यवान किंवा लकी मानतात. जे ते नेहमी सोबत ठेवतात. ही गोष्ट काहीही असू शकते. कदाचित तो तुमचा बेल्ट किंवा तुमचे जुने वॉलेट असेल. आपल्यापैकी बहुतेक जण अशा गोष्टी फक्त काही काळासाठी वापरतात. यानंतर, जेव्हा ते खराब होण्याच्या स्थितीत येतात तेव्हा आपण या वस्तूंच्या जागी नवीन वस्तू आणतो, परंतु काही लकी पाकीट-पर्सच्या बाबतीत आपण वेगळा विचार करतो आणि खराब झाल्यानंतर त्यांना फेकून देणं थोडे कठीण होतं. भोपाळचे पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी लकी पाकिटाविषयी माहिती दिली (Wallet and Jyotish Shastra) आहे. जुन्या पाकिटाचे काय करायचे? आपण जुनं पाकिट बदलून जेव्हा नवीन पाकिट घेतो तेव्हा, अगोदरच्या जुन्या पाकिटामधील वस्तू रिकाम्या करा आणि नवीन पाकिटामध्ये ठेवा. त्यानंतर जुन्या पाकिटामध्ये लाल कपड्यात गुंडाळून 1 रुपयांचे नाणे ठेवा. असे केल्याने आपल्या जुन्या पाकिचामध्ये जसा पैसे येण्यासाठी ओघ होता तसात तो नवीन पाकिटातही राहील. हे वाचा - Googleने बॅन केले Login-IDचोरी करणारे Apps,लगेच डिलीट करुन बदलाFacebook Password जर तुमचे जुने पाकिट/पर्स तुमच्यासाठी भाग्यवान असेल तर ती फेकून देण्याची चूक कधीही करू नका आणि ते पाकिट कधीही रिकामे ठेवू नका. जुन्या पाकिटामध्ये तांदळाचे काही दाणे ठेवू शकता. नंतर तुम्ही हे तांदूळ तुमच्या नवीन पर्समध्ये हस्तांतरित करा. असे केल्याने आपल्या जुन्या पाकिटामधील सकारात्मक ऊर्जा नवीन पर्समध्ये वाहते. तुम्हाला तुमचे जुने पाकिट खूप आवडत असेल आणि तुम्हाला ते फेकून द्यायचे नसेल, तर तुम्ही त्या पर्सवर लाल कापड गुंडाळून तुमच्या तिजोरीत ठेवू शकता. पण पर्स तिजोरीत ठेवताना ती रिकामी राहू नये हे लक्षात ठेवा. त्यात रुमाल, तांदूळ, पैसे काहीही ठेवू शकता. हे वाचा - घरबसल्या असे बनवा तुमचे मतदान ओळखपत्र, Online च्या सर्व स्टेप जाणून घ्या जर तुमचे जुने लकी पाकिट/पर्स फाटलेली असेल आणि तरीही तुम्हाला ती तुमच्याकडे ठेवायची असेल, तर ती पूर्णपणे दुरुस्त केल्यानंतरच वापरायला घ्या. फाटलेली पर्स सोबत ठेवल्यास राहु कमजोर होईल. यामुळे तुमचे पैसे बुडू शकतात. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य ज्योतिषशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.