नवी दिल्ली, 3 जून: वजन कमी करणं (Weight Loss) हे असंख्य लोकांसमोरचे मोठे आव्हान असते; मात्र जंक फूड (Junk Food) खाण्याच्या तीव्र इच्छेमुळे अनेकांचे वजन कमी करण्याची सगळी मेहनत वाया जाते. अशा लोकांसाठी ‘फूडटी’ (FoodT) नावाचा चक्क एक मोबाइल गेम उपयुक्त ठरू शकतो, असा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे. इंग्लंडमधील एक्झीटर विद्यापीठ (Exeter University) आणि फिनलंडच्या हेलसिंकी विद्यापीठातील (Helsinki University) संशोधकांनी हे अभिनव संशोधन केलं असून, त्यासाठी हे फूड ट्रेनर गेम अॅप विकसित केलं आहे. हे अॅप लोकांची जंक फूडची तल्लफ कमी करण्यासाठी मेंदूला प्रशिक्षण देणाऱ्या खास तंत्रांचा वापर करते.
हे फूड ट्रेनर अॅप (Food Trainer App) गूगल प्ले स्टोअर किंवा अॅपलच्या अॅप स्टोअरवरून डाउनलोड करता येते. ‘अॅपेटीट’च्या (Appetite) ऑक्टोबरच्या अंकात हा अभ्यास अहवाल प्रकाशित करण्यात आला होता.
माधुरी दीक्षितसारखे केस हवेत? फॉलो करा तिने दिलेल्या खास Tips
या अॅपच्या चाचण्यांदरम्यान, असं आढळलं की दिवसातून किमान एकदाच हे अॅप वापरलं, ज्याला फक्त चार मिनिटे लागतात तर जंक फूडचा वापर आठ गुणांपैकी एका गुणाने कमी होतो. एका दिवसात चार ते पाच वेळा जंक फूड खाण्याच्या सवयीपासून ते एका महिन्यात एक किंवा शून्यवेळा जंक फूड खाण्यापर्यंत याचा परिणाम होतो.
‘उदाहरणार्थ, एक महिनाभर नियमितपणे हे अॅप वापरल्यास एखादी व्यक्ती आठवड्यातून दोन ते चार वेळा जंक फूड खात असेल तर ते प्रमाण आठवड्यातून एक एवढं कमी होतं’, अशी माहिती एक्झीटर विद्यापीठाच्या ट्रान्सलेशनल औषध विषयाच्या सहयोगी प्राध्यापक नतालिया लॉरेन्स यांनी विद्यापीठातर्फे प्रसारित करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.
ऐकावे ते नवल! बार्बी डॉलसारखं दिसण्यासाठी खर्च केले 72 लाख रुपये
हा फूड ट्रेनर गेम युजरला त्याच्या दररोजच्या वापरातील गोष्टी लाल किंवा हिरव्या सर्कलद्वारे दाखवतो. युजरनं हिरव्या सर्कलमधील गोष्टीवर टॅप केले तर तो त्यांना एक पॉईंट देतो; पण लाल सर्कलमधील गोष्टीवर टॅप केल्यास एक पॉईंट वजा होतो. वेगवेगळ्या गोष्टी दाखवता दाखवता हे अॅप पौष्टिक आणि आरोग्यास घातक अशा पदार्थांची चित्रं दाखवते. पौष्टिक पदार्थ नेहमी हिरव्या सर्कलमध्ये दिसतात तर आरोग्यासाठी वाईट पदार्थ नेहमी लाल सर्कलमध्ये येतात. बक्षीस पद्धतीचा वापर करून हे अॅप युजरच्या मेंदूला पौष्टिक पदार्थांना सकारात्मक आणि जंक फूडला नकारात्मक प्रतिसाद देण्यासाठी प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करते. युजरला झालेल्या फायद्याचे, त्याच्या प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी हे अॅप प्रश्न विचारत राहते.
Alert! तुम्हीही Domino’sमधून ऑर्डर केलाय पिझ्झा? बँक अकाउंट धोक्यात,पाहा डिटेल्स
एका युजरनं हे अॅप वापरल्यानंतर त्याची जंक फूडची सवय कमी झाल्याचं प्ले स्टोअरवर म्हटलं आहे. मात्र हे निष्कर्ष सावधगिरीने घेतले पाहिजेत कारण इतरही कारणांमुळे युजर त्यांच्या जंक फूडच्या सवयींपासून परावृत्त होतात, असं संशोधकांनी म्हटलं आहे.
Key words :
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Game, Junk, Weight loss