मुंबई, 2 जून- बार्बी डॉल (Barbie Doll) हा जगभरातल्या लहान मुलींचा आवडीचा विषय आहे. अनेक मुलींच्या विश्वाचा बार्बी डॉल हा एक अविभाज्य घटक असतो. त्यांच्या प्रत्येक खेळात त्या सहभागी असतात. लहानग्यांच्या विविध कार्यक्रमांत किंवा अन्य कोणत्याही सोहळ्याच्या वेळीदेखील बार्बी डॉलसारखा ड्रेस आणि मेक-अप करण्याची त्यांची इच्छा आणि तयारी असते. एवढंच नव्हे, तर मोठं झाल्यानंतरही अनेक जणी बार्बीसारखी फिगर (Figure) करण्यासाठी धडपडत असतात. त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्याचीही त्यांची तयारी असते. यापैकीच एक उदाहरण म्हणजे प्रसिद्ध मॉडेल ब्लाँडी बेनेट (Blondie Bennett).
सडपातळचं नव्हे, तर मस्क्युलर बार्बी (Muscular Barbie) बनावं असं तिचं स्वप्न आहे. त्यासाठी तिने स्वतःमध्ये खूप बदल घडवून आणले आहेत. तसंच अनेक प्रकारच्या सर्जरीदेखील तिने करून घेतल्या आहेत. ‘टीव्ही नाइन हिंदी’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. ब्लाँडी बेनेट ही अमेरिकेतली एक प्रसिद्ध मॉडेल आहे. सात वर्षांपूर्वी ती एखाद्या सर्वसामान्य अमेरिकी महिलेप्रमाणेच होती. तेव्हाही ती मॉडेलिंग (Modelling) करायची; मात्र त्यानंतर अचानक तिच्या मनात आलं, की आपण बार्बीसारखं बनायचं आणि सडपातळ नव्हे, तर पिळदार शरीरयष्टी बनवायची. त्यासाठी शरीरात अनेक बदल घडवून आणणं आवश्यक होतं. ते आव्हान तिने स्वीकारलं आणि बार्बी बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली.
त्यासाठी तिने व्यायामावर लक्ष केंद्रित केलं. चार वर्षं तिने प्रशिक्षकाच्या देखरेखीत व्यायाम केला. त्यानंतर तिचं वजन वाढू लागलं आणि शरीरयष्टी पीळदार दिसू लागली. सुरुवातीच्या काळात तिला पाच पौंड वजनही उचलणं अवघड होतं; मात्र आता ती ते वजन अगदी सहजपणे उचलू शकते. व्यायामामुळे कमावलेल्या शरीरयष्टीला तिने कृत्रिम, बाह्य उपचारांचीही जोड दिली. त्यासाठी तिला अनेक प्रकारच्या सर्जरी करून घ्याव्या लागल्या. या सर्जरीसाठी तिने थोडेथोडके नव्हे, तर तब्बल एक लाख अमेरिकी डॉलर एवढे पैसे खर्च केले आहेत.
(हे वाचा: असे Breast नको गं बाई! आपल्या स्तनांना वैतागली महिला कारण… )
म्हणजेच भारतीय रुपयांत होणारी किंमत 72 लाख 50 हजार रुपयांहून अधिक आहे. एवढी रक्कम ऐकूनच आपल्या अंगाला दरदरून घाम फुटू शकतो. ब्लाँडी म्हणते, की हा खर्च खूपच जास्त आहे, याची मला कल्पना आहे; मात्र बार्बीसारखं बनणं हे माझं स्वप्न होतं आणि ते पूर्ण करण्यासाठी माझी वाटेल ते करायची तयारी होती. म्हणूनच हा खर्च करताना मला फारसं काही वाटलं नाही. फेसलिफ्ट, लिपलिफ्ट, लिप इम्प्लांट, डोळ्यांची सर्जरी, गालांची सर्जरी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया (Surgeries) ब्लाँडीला करून घ्याव्या लागल्या, अशी माहिती तिने ट्रुली या चॅनेलला दिली.
(हे वाचा: फुडी IPS अधिकारी कसा झाला फॅट टू फिट? शेअर केली आपली Weight loss Journey )
ती सांगते, की मला बार्बी का बनायचं आहे, असे प्रश्न अनेक जण वारंवार विचारतात. त्यावर मी उत्तर देते. ‘बार्बीसारखं बनायला कोणाला आवडणार नाही बरं? तिचं आयुष्य उत्तम असतं. तिला कोणत्याही गोष्टीची चिंता करावी लागत नाही. ती केवळ वेगवेगळ्या गोष्टींची खरेदी करते, स्वतःला सुंदर बनवते आणि तसं राखते,’ असं ब्लाँडी म्हणते.