दिल्ली, 2 जून : माधुरी दीक्षित (Madhuri Dixit)वयाने कितीही मोठी झाली, तरी ती अजूनही अनेकांच्या हृदयातली धकधक गर्ल आहे. तिचा एक खास चाहता वर्ग आहे. माधुरिच्या अभिनयाचे डान्सचे (Madhuri Dixit Dancing)सगळेच वेडे आहेत. पण तिचं आरस्पानी सौंदर्य(Beauty)आणि कायम राखलेल्या फिटनेसवर (Fitness) प्रेम करणाऱ्यांचींही संख्या कमी नाही. माधुरी दीक्षितकडे पाहून तिने पन्नाशी ओलांडली यावर विश्वासच बसत नाही. या वयातल्या इतरांना अहो-जाहो करतो आपण, पण माधुरीबद्दल आदर तितकाच असला तरी तिच्या चिरतरुण सौंदर्यामुळे तिचा एकेरी उल्लेखच हवाहवासा वाटतो. माधुरी दीक्षित नेने नेहमी सोशल मीडियावरून (Social Media) आपल्या चाहत्यांशी संवाद साधते. तिने आपल्या सौंदर्याचं सिक्रेट (Secret) सोशल मीडियावर शेअर केलं आहे. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी हेल्दी लाइफस्टाइल (Healthy Lifestyle) असणं फार महत्वाचं आहे, असं तिचं मत आहे. आपली जीवनशैली निरोगी नसेल तर, त्याचा परिणाम केवळ आपल्या आरोग्यावरच होत नाही तर त्वचा आणि केसांवरही होतो. स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी भरपूर पाणी (Drink water) प्या असं माधुरी सांगते. पाणी शरीरातून टॉक्सिन बाहेर टाकण्यास मदत करतं. पाणी त्वचेला हायड्रेट देखील ठेवतं, म्हणून योग्य आहार आणि बायोटिन व्हिटॅमिन सप्लिमेंट्स यांच्याबरोबर पाणी प्यावं. स्किनबरोबर केसांसाठीही माधुरीने टिप्स दिल्या आहेत. आपल्या ट्विटर हँडलवरून तिने या ब्युटी टिप्स दिल्या आहेत. आपण आपल्या केसांची कशी काळजी घेतो हे तिने या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. केसांच्या चांगल्या वाढीसाठी, केसं कापणं आवश्यक आहे. त्यामुळे खराब केस, दुभंगलेली टोकं (Splitends) निघून जातात आणि केसांची चांगली वाढ होते.
Let's talk about hair care?💆♀️Check out my routine & also some tips and tricks - https://t.co/qlFdLKWT9u pic.twitter.com/LHaiuCIDEH
— Madhuri Dixit Nene (@MadhuriDixit) March 16, 2021
माधुरीच्या टिप्स केसांमध्ये ड्रायर आणि आयनिंग मशिन जास्त प्रमाणात वापरल्याने केस खराब होतात. त्यामुळे त्यांचा वापर कमी करा. साध्या टॉवेलमुळेही खसाखसा केस पुसले तर केसांचं नुकसान होतं आणि त्याने केस कोरडे होत नाहीत. त्यामुळे मायक्रोफायबर कपड्याचा वापर करावा. जर, आपल्याला केस गळती आणि डोक्यातील कोंड्यापासून मुक्ती हवी असेल तर, केस फार गरम पाण्याने अजिबात धुऊ नका. स्काल्पला नुकसान झालं तर त्याने केस खराब होऊ शकते. फक्त कोमट किंवा थंड पाण्याने केस धुवा. कंगव्याने जोरात केस विंचरल्याने ते तुटतात त्याऐवजी केस हळूवारपणे ब्रश करा. खूप थंड ठिकाणी राहणाऱ्यांना आपलं केस मंकीकॅप किंवा स्कार्फने झाकून ठेवावेत. केसांना तेलाने नियमित मॉलिश करणं आवश्यक आहे. त्याने केसांचं पोषण होतं. तेल कसं बनवायचं यासाठी माधुरी यांनी काही टिप्स सांगितल्या आहेत. अर्धा कप खोबरेल तेलात 15 ते 20 कढीपत्त्यांची पानं, मेथीदाणे आणि कांद्याचे छोटे तुकडे टाका. या सगळ्या वस्तू उकळा. 2 दिवस तसंच ठेवा. त्यानंतर केसांसाठी वापरा. हेअर मास्क कसा बनवायचा यासाठी माधुरी यांनी काही टिप्स सांगितल्या आहेत. केळं, 2 चमचे दही आणि एक चमचा हळद एकत्र करून केसांना लावा. वरुन शॉवर कॅप घाला. 40 मिनिटांनी शॅम्पूने धुवून टाळा. त्यानंतर केसांना कंडीश्नर करू नका. या पॅकने केस मऊ आणि चमकदार बनतील.