मुंबई, 14 फेब्रुवारी : आज सर्वत्र व्हॅलेंटाईन डे साजरा होता आहे. अशात एका बॉलिवूड अभिनेत्रीनेही सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. जी चक्क मेन्स अंडरगार्मेंट्सच्या प्रेमात पडली आहे. तिनं मोठं पाऊल उचललं आहे. तिनं असं काही केलं आहे, जे आजवर कदाचित कुणीच केलं नाही. तिचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नाही तर जॅकलिन फर्नांडिस आहे.
बऱ्याच जाहिराती तुम्ही पाहिल्या असतील ज्यात महिला महिलांच्या वस्तूंच्या तर पुरुष पुरुषांच्या उत्पादनांच्या जाहिराती करतात. आतापर्यंत तुम्ही किती तरी पुरुषांच्या अंडरविअरच्या जाहिराती पाहिल्या असतील. ज्यात शक्यतो पुरुषच दिसतात. पण आता अभिनेत्री जॅकलिनने पुरुषांच्या अंडरगार्मेंट्सची जाहिरात केली आहे. देशातील सर्वात मोठ्या इनरवेअर उत्पादनांपैकी एक असलेल्या लक्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या लक्झ कोझीच्या जाहिरातीत ती दिसली.
हे वाचा - डोक्यावर केस नाहीत म्हणून नोकरी गेली; पण तेच 'टक्कल' ठरलं लकी, बनला लखपती
लक्स इंडस्ट्रीज लिमिटेड देशातील सर्वात मोठ्या इनरवेअर उत्पादकांपैकी एक असलेली कंपनी. जी 14 प्रमुख ब्रँड्समध्ये 100 हून अधिक उत्पादने तयार करते तसंच नाविन्यपूर्ण आणि ग्राहकांच्या मागणीनुसार उत्पादन ऑफरसाठी प्रसिद्ध आहे. या कंपनीने आता आपल्या लक्स कोझीच्या उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी महिला सेलिब्रिटी जॅकलीन फर्नांडिसला सामील करून घेतले, जे कोणत्याही पुरुषांच्या इनरवेअर ब्रँडमध्ये प्रथमच घडत आहे.
यासाठी ब्रँडने 'येलो बीटल फिल्म्स' निर्मित आणि गौरी शिंदे दिग्दर्शित 'ये नहीं तो कुछ नहीं' ही नवीन TVC मोहीम सुरू केली आहे.
हे वाचा - काय सांगता! फक्त 99 रुपयांत घर; 'या' योजनेअंतर्गत मिळतेय स्वस्त घरखरेदीची संधी
लक्स कोझीने पुरुषांसाठी असलेल्या जाहिरातीमध्ये प्रथमच एका महिलेचा समावेश केला आहे आणि विचारसरणीत लक्षणीय बदलाच्या दिशेने मोठं पाऊल टाकलं आहे. यामुळे लोकांचं लक्ष वेधून घेत आणि आजच्या तरुणांच्या अपेक्षा आणि आकांक्षा पूर्ण करतानाच ब्रँडचे कनेक्शन मजबूत होईल अशी अपेक्षा कंपनीला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Advertisement, Entertainment, Jacqueline fernandez, Lifestyle, Valentine Day