लंडन, 14 फेब्रुवारी : आपलं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण वाढत्या महागाईत घर खरेदी करणं अनेकांना शक्य नाही. अगदी महाग नाही पण कमीत कमी किमतीत अनेक लोक घर शोधत असतात. तरीपण घरांच्या किमती लाखो रुपयांत असतात. अशात तुम्हाला फक्त 100 रुपयांत घर मिळतं आहे, असं कुणी सांगितलं तर… काय तुम्हाला जोर का झटका बसला ना? असं घर कुठे आणि कुणाला मिळत आहेत पाहुयात.
खरंतर 100 रुपयांत घर मिळतं आहे, हे वाचूनच तुम्हाला विश्वास बसत नसेल. पण हे खरं आहे, एका योजनेअंतर्गत इतक्या कमी किमतीत घर खरेदी करण्याची संधी मिळते आहे. ही योजना आहे, हेल्प टू बाय स्कीम. मेहनती आणि असे लोक ज्यांनी स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पैसे जमवण्यासाठी संघर्ष केला आहे, अशा लोकांसाठी ही योजना आहे. श्रमिकांचं संपत्तीचं स्वप्नं करून त्यांनाही एका मार्गावर आणणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे.
हे वाचा - मुंबईत आहे भारतातील सर्वांत महागडं पेंट हाऊस; 240 कोटी रुपयांना झालं डील
दोन, तीन आणि चार बेडरूम घर विकले जात आहेत. या घरात राहणाऱ्या रहिवाशांना 25 वर्षे भाड्याने हे घर घेतल्यानंतर त्यांना ते घर खरेदी करण्याची परवानगी मिळेल. या योजनेअंतर्गत एक लॉयल्टी प्रीमिअम काढलं जाईल. यानंतर तुम्ही £1 म्हणजे फक्त 99.67 रुपयांत घर खरेदी करू शकता. या योजनेअंतर्गत 100 घरं आहेत. सुरुवातीच्या 20 वर्षांत योजना सोडल्यास भाडेकरूंना त्यांचा प्रीमिअम रोख पैशांच्या स्वरूपात मिळेल.
या योजनेअंतर्गत घर खरेदी करणारी व्यक्ती वॉनाबेनं या योजनेबाबत माहिती दिली आहे. त्याने सांगितलं, व्यक्ती आपली संपत्ती फक्त 99.67 रुपयांत खरेदी करू शकते. आणखी एक खरेदीदार जेम्स टेलर जे आपल्या कुटुंबासह हेल्प टू बाय स्कीम योजनेअंतर्गत घेतलेल्या घरात राहत आहेत. ते म्हणाले, आम्हाला हे खूप आवडलं. हे वाचा - Home buying Tips: घर खरेदी करण्यापूर्वी ‘या’ 4 गोष्टी तपासा, नाहीतर येईल पश्चातापाची वेळ आता ही योजना कुठे लागू आहे तर इंग्लंडच्या वेस्ट मिडलँड्सच्या वॉल्वहरहॅम्पटन सिटीमध्ये. विलमॉट डिक्सन कन्स्ट्रक्शन कंपनी 266 घरं उभारत आहे. त्यातील काही तयार झाली आहे, तर काहींचं काम सुरू आहे.