नवी दिल्ली, 06 मार्च : अनेकदा आपण कामामुळं थकलेलो असतो, तेव्हा आपल्याला दुपारी थोडी विश्रांती घ्यायला आवडते. कारण, त्यामुळं थकवा निघून जाऊन आपण पुन्हा फ्रेश (Refresh) होतो. दिवसा झोपणं सर्व वयोगटातील लोकांसाठी फायदेशीर आहे. परंतु, त्याचे काही तोटे (Disadvantages of daytime sleepiness) देखील आहेत, जे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे.
दिवसाच्या झोपेचा आरोग्यावर परिणाम
दिवसा झोपण्यामुळं थकवा आणि सुस्तीपासून आराम मिळतो. परंतु, काही लोकांना ही सवय त्रासदायक ठरू शकते. यामुळं रात्रीच्या नैसर्गिक झोपेच्या चक्रावर परिणाम होऊ शकतो आणि अशा स्थितीत रात्री चांगली झोप येत नाही.
दिवसा डुलकी काढण्याच्या सवयीमुळं वाढू शकतो आळशीपणा
काही लोकांसाठी, दुपारची झोप हा स्वतःला फ्रेश करण्याचा एक सोपा मार्ग आहे, परंतु अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झालंय की, याच्यामुळं स्मरणशक्ती सुधारते. परंतु, सतर्कता कमी होऊ शकते. दुपारी एक तासापेक्षा जास्त वेळ झोपल्यानं शरीर सुस्त होऊ शकतं.
हे वाचा - ज्यांच्यात हे 5 गुण असतात, त्यांच्यावर भाळतात मुली; तुमच्याकडे आहे का हा गुण?
आयुर्वेद काय सांगतो?
आयुर्वेदानुसार दिवसा झोप घेणं चांगलं मानलं जात नाही. असं केल्यानं कफ आणि पित्त दोषामध्ये असंतुलन होऊ शकतं. मात्र, निरोगी लोक उन्हाळ्यात दिवसा झोपू शकतात.
या लोकांनी दिवसा झोपू नये
मधुमेह आणि लठ्ठपणानं ग्रस्त असलेल्यांनी दिवसा झोपू नये. कारण, यामुळं वजन वाढणं, ताप येणं, स्मरणशक्ती कमी होणं आणि रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होणं अशा समस्या येऊ शकतात.
हे वाचा - रिकाम्या पोटी रक्तातील साखरेची पातळी का बरं वाढते? मधुमेहींनी अशी घ्यावी काळजी
दिवसातून किती वेळ झोपावे?
अनेक अभ्यासांमध्ये असं समोर आलंय की, दुपारी सुमारे 15 ते 20 मिनिटं झोप घेणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. याचं नियोजनपूर्वक पालन करण्यासाठी, झोपताना अलार्म सेट करा, शांतपणे झोप घ्या आणि ठरवलेल्या वेळेत उठा.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sleep, Sleep benefits