Home /News /lifestyle /

ज्यांच्यात हे 5 गुण असतात, त्यांच्यावर भाळतात मुली; तुमच्याकडे आहे का हा गुण?

ज्यांच्यात हे 5 गुण असतात, त्यांच्यावर भाळतात मुली; तुमच्याकडे आहे का हा गुण?

अनेक मुलांना गर्लफ्रेंड नसते. त्यांना वाटतं की मुली फक्त पुरुषांचं सौंदर्य किंवा देहयष्टी पाहूनच त्यांच्यावर भाळतात. पण तसं नाही. आज आम्ही तुम्हाला अशी 5 गुणवैशिष्ट्यं सांगत आहोत, जी प्रत्येक मुलीला तिच्या जोडीदारामध्ये पाहायला आवडतात.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 03 मार्च : हल्ली तरुण मुला-मुलींमध्ये रिलेशनशिप (Relationship) असणं ही बाब सामान्य झाली आहे. या जोडप्यांना त्यांच्या रोजच्या कामातून वेळ काढून एकत्र क्वालिटी टाईम (Quality time) घालवायला आवडतं. अनेक मुलांना गर्लफ्रेंड नसते. त्यांना वाटतं की मुली फक्त पुरुषांचं सौंदर्य किंवा देहयष्टी पाहूनच त्यांच्यावर भाळतात. पण तसं नाही. आज आम्ही तुम्हाला अशी 5 गुणवैशिष्ट्यं सांगत आहोत, जी प्रत्येक मुलीला तिच्या जोडीदारामध्ये पाहायला आवडतात. जाणून घेऊया काय आहेत ती वैशिष्ट्यं. साधेपणानं राहायला आवडणारी मुलं मुलींना आवडतात झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, मुलींना नीटनेटकेपणानं आणि साधेपणानं राहणारी मुलं आवडतात. जर तुम्ही खूप दिखाऊ किंवा फेकू प्रकारात मोडत असाल तर, तुम्हाला मुलींची कायमची सोबत मिळू शकणार नाही. मुली अशा मुलांना जास्त काळ सहन करू शकत नाहीत. मुली अशा मुलांशी रिलेशनशिपमध्ये राहण्याचं टाळतात. महिलांचा आदर महिलांचा आदर करणारी मुलं पहिल्या नजरेतच मुलींच्या मनात घर करून जातात. तर, मुलींची चेष्टा करणारी किंवा त्यांना कमीपणा देऊन वागणारी मुलं मुलींना आवडत नाहीत. त्यांना असं वाटतं की, जो मुलगा किंवा पुरुष इतर स्त्रियांचा आदर करत नाही, तो एक दिवस त्यांचाही अपमान करू शकतो. काळजी घेणारी मुलं (caring nature) मुलींना आवडतात मुलींना त्यांचा साथीदार त्यांची आणि इतर आप्तेष्टांची, मित्र-मैत्रिणींची काळजी घेणारा असावा असं वाटतं. अशा स्वभावाचा मुलगा किंवा पुरुष मुलींना आवडतो. सुख-दुःखाच्या प्रत्येक प्रसंगात त्यानं तिच्यासोबत उभं रहावं, त्याच्या भावनांची काळजी घ्यावी आणि त्यांना कधीही संकटात एकटं सोडणार नाही, अशा स्वभावाच्या मुलांच्या प्रेमात मुली लवकर पडतात. हे वाचा - दाढी वाढवण्यासाठी आहारात करा असा बदल; भारदस्त दाढी-मिशांचा दिसेल कडक लूक मुलींना खुल्या मनाची मुलं आवडतात स्वातंत्र्य प्रत्येकालाच प्रिय असतं. मुलींना खूप संकुचित स्वभावाची किंवा त्यांना स्पेस न देणारी मुलं आवडत नाहीत. त्यांच्यावर बंधनं लादण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलापासून त्या लवकरच दूर जातात. तिला असा जोडीदार हवा असतो, जो खुल्या मनाचा असेल आणि तिच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा आदर करेल. जी मुलं किंवा पुरुष मुलींवर आपली इच्छा लादतात किंवा परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून न घेणारी किंवा तशी इच्छा नसलेली असतात, त्यांना मुली नाकारतात. हे वाचा - तुमच्या मुलाला Diabetes होऊ द्यायचा नसेल तर या गोष्टींची वेळीच खबरदारी घ्या मैत्रीपूर्ण स्वभावाची माणसं आवडतात मुली कुणालाही बॉयफ्रेंड म्हणून स्वीकारण्याआधी त्याच्यामध्ये एक सच्चा मित्र शोधत असतात. मुलींना त्यांच्या प्रियकराचा स्वभाव मैत्रीपूर्ण असावा, असं वाटतं. त्याचा स्वभाव फार कडक नसावा. मुलींच्या फिरण्याची, ठराविक प्रकारच्या पेहरावाची त्याला 'अ‍ॅलर्जी' नसावी. मुलींना त्यांना मदत करायला येणारी मुलं आवडतात. मुली अशा मुलांच्या प्रेमात पडतात. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Relation, Relationship tips

    पुढील बातम्या