Breasfeeding करणाऱ्या आईने अंडं खाणं सुरक्षित आहे का?

Breasfeeding करणाऱ्या आईने अंडं खाणं सुरक्षित आहे का?

प्रेग्नन्सीप्रमाणे डिलीव्हरीनंतरही महिलांच्या आहाराबाबत विशेष काळजी घ्यावी लागते. कारण आईच्या दुधातूनच (Breasfeeding) बाळाला पोषक घटक मिळत असतात.

  • Share this:

मुंबई, 08 जून : प्रेग्नन्सीमध्ये (pregnancy) आणि प्रसूतीनंतरही (delivery) महिलेच्या आहाराची (diet) विशेष काळजी घेतली जाते. कारण त्यावर त्या महिलेचं आणि तिच्या बाळाचं (baby) आरोग्य अवलंबून असतं. आई जे काही खाते त्यातील पोषक घटक प्रेग्नन्सीमध्ये गर्भात आणि प्रसूतीनंतर दुधातून बाळाला मिळतात. त्यामुळे आई आणि बाळाच्या आरोग्यावर दुष्परिणाम होईल असे पदार्थ न खाण्याचा सल्ला त्या महिलेला दिला जातो. अनेक महिलांच्या मनात विचार येतो की प्रेग्नन्सीत आणि प्रसूतीनंतर बाळाला स्तनपान (breastfeeding) सुरू असताना अंडं (egg) खाणं सुरक्षित आहे का?

अंडं हा प्रोटिनचा स्रोत आहे. याशिवाय यामध्ये फोलेट, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स तसंच कॅल्शिअम, फॉस्फरस सेलेनियम, झिंक असे मिनरल्स आणि ल्युटेन, झेक्सानथिन यासारखे बायोअ‍ॅक्टिव्ह घटक असतात. त्यामुळे प्रेग्नन्सीत आणि डिलीव्हरीनंतर महिलांना अंडं खाण्याचा सल्ला दिला जातो.

अंडं खाल्ल्याने आई आणि बाळाला काय फायदा होतो?

अंड्यामध्ये अमिनो अ‍ॅसिड असतं, ज्यामुळे महिलांना पुन्हा ताकद मिळते आणि बाळाच्या स्नायूंचा विकास होतो.

अंड्यात ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड असतं, कोलाइन, फोलेट आणि फॉस्फरस, झिंक यासारखे मिनरल्स असतात, ज्यामुळे बाळाच्या मेंदूचा योग्य विकास होण्यास मदत होते.

हे वाचा - लहान मुलांनाही असू शकतो ब्रेन ट्युमर; या लक्षणांकडे दुर्लक्ष नको

अंड्यामध्ये इतके पोषक घटक असतात ज्यामुळे महिलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

अंड्यामध्ये कॅल्शिअम आणि फॉस्फरस असतं, ज्यामुळे महिलांची हाडं मजबूत होतात, शिवाय बाळाच्या हाडांचाही विकास होतो.

माय उपचारवर माहिती देताना जनरल फिजिशिअन डॉ. मेधवी अगरवाल यांनी सांगितलं, अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात आणि जे बाळाच्या विकासासाठी आवश्यक असतात. मात्र काही पदार्थांची बाळाला अ‍ॅलर्जी असू शकते आणि त्यामध्ये अंडंही असू शकतं.

बाळाला एखाद्या पदार्थाची अ‍ॅलर्जी झाली आहे याची लक्षणं काय आहेत?

उलटी होणं

पोटात दुखणं

बाळाच्या मलातून रक्त किंवा एखादा स्राव पडणं

रॅश आणि सूज

अगदी दुर्मिळ प्रकरणात श्वास घेण्यात त्रास आणि तोंडाला सूज

पिडियाट्रिक्स जर्नलमध्ये 2009 साली प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार अंड्याच्या अलर्जीमुळे बाळाला एक्झेमाही होऊ शकतो.

हे वाचा - प्रेग्नन्सीत महिलेला झाला कोरोना; अँटिबॉडीजसह जन्माला आलं बाळ

"अशी लक्षणं दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टर बाळाला कोणत्या पदार्थाची अ‍ॅलर्जी आहे तपासून सांगतात आणि तो पदार्थ न खाण्याचा सल्ला आईला देतात. जर बाळाला अंड्याची अ‍ॅलर्जी असेल तर आईने अंडं खाऊ नये", असा सल्ला डॉ. मेधवी अगरवाल यांनी दिला.

"जर बाळाला अंड्याची अ‍ॅलर्जी होत नसेल तर आई बिनधास्त अंड खाऊ शकते. मात्र अंडं सुरक्षित असेल याची काळजी घ्या. अंडं खरेदी करताना ते तुटलेलं नाही ना हे तपासून पाहा. अंडं घेतल्यानंतर दोन तासांच्या आत ते फ्रिजमध्ये एका वेगळ्या डब्यात ठेवा, उघडं ठेवू नका. कच्चं किंवा हाफ फ्राय अंडं खाऊ नका. उकडलेली अंडी खा. फ्राय करून खात असाल तर चांगल्या तेलाचा वापर करा. शिजवून फ्रिजमध्ये ठेवलेलं अंडं खाऊ नका", असं डॉ. अगरवाल यांनी सांगितलं.

हे वाचा - गरम की थंड; कोणत्या पाण्याने करावी अंघोळ?

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: June 8, 2020, 2:52 PM IST

ताज्या बातम्या