मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

गरम की थंड; कोणत्या पाण्याने करावी अंघोळ?

गरम की थंड; कोणत्या पाण्याने करावी अंघोळ?

अंघोळीसाठी (bath) पाणी कसं असावं हे प्रत्येकाची आवड आणि सवयीवर अवलंबून आहे. मात्र गरम (hot water) आणि थंड पाण्याचे (cold water) वेगवेगळे फायदे आहेत.

अंघोळीसाठी (bath) पाणी कसं असावं हे प्रत्येकाची आवड आणि सवयीवर अवलंबून आहे. मात्र गरम (hot water) आणि थंड पाण्याचे (cold water) वेगवेगळे फायदे आहेत.

अंघोळीसाठी (bath) पाणी कसं असावं हे प्रत्येकाची आवड आणि सवयीवर अवलंबून आहे. मात्र गरम (hot water) आणि थंड पाण्याचे (cold water) वेगवेगळे फायदे आहेत.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 06  जून : काही जणांना अंघोळीसाठी (bath) गरम पाणी (hot water) लागतं, तर काही जणांना थंड पाण्याने (cold water) अंघोळ करायला आवडतं. थंड की गरम कोणत्या पाण्याने अंघोळ करावी हे प्रत्येकाची आवड आणि सवयीवर अवलंबून तर आहेच. मात्र पाण्याचं तापमान आणि आरोग्याचा विचार करता गरम किंवा थंड पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे वेगवेगळे फायदे आहेत. थंड पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे थंड पाण्यामुळे झोप उडते, ताजंतवानं वाटतं, एक वेगळीच ऊर्जा मिळते. रक्तप्रवाहावर परिणाम होतो, शरीराचं तापमान नियंत्रणात राहतं. यामुळे तुमची झोप उडते. व्यायाम केल्यानंतर थंड पाण्याने अंघोळ केल्याने शरीराला आराम मिळतो, थकवा दूर होतो. हे वाचा - कमी वयात तुमचेही केस पांढरे झालेत का? आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा त्वचेला खाज येत असेल तर थंड पाण्याने अंघोळ केल्याने या खाजेपासून मुक्ती मिळते. गरम पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे वाहतं नाक, डोकं जड होणं अशी फ्लूसारखी लक्षणं असल्यास त्यापासून आराम मिळतो. गरम पाण्यामुळे त्वचेवरील रंध्रे खुली होतात गरम पाण्याने अंघोळ म्हणजे एकप्रकारे मसाज झाला. स्नायूंवरील ताण कमी होतो. शरीराला आराम मिळतो. वेदना कमी करण्यात मदत होते. हे वाचा - तुम्हीही तुमच्या मर्जीने डाएट करता का? मग 'हे' वाचाच माय उपचारवर डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, थंड किंवा गरम पाण्याने अंघोळ करणं हे प्रत्येकाच्या आवडीवर आणि सवयीनुसार आहे. मात्र अगदी कडक आणि अगदी थंड पाण्याने अंघोळ करू नये. फ्लूसारखी लक्षणं असल्याचं गरम पाण्याने अंघोळ करावी, जेणेकरून तुमच्यामधील ही लक्षणं कमी होतील. अशावेळी थंड पाण्याने अंघोळ करू नये नाहीतर लक्षणं अधिक तीव्र होतील. गरम पाण्यामुळे त्वचा कोरडी होती. गरम पाण्याने अंघोळ केल्यानंतर तुमच्या त्वचेवर असा फरक जाणवला असेल. त्यामुळे एक्झेमासारख्या त्वचेच्या समस्या असल्यास गरम पाण्याने अंघोळ करणं टाळावं. गरम पाण्याने अंघोळ केल्यानंतर त्वचेला मॉईश्चरायझर जरूर लावावं. हे वाचा - लहान मुलांना ज्युस देताना काळजी घ्या, 'या' वयापर्यंत ज्युस बिलकुल देऊ नका
First published:

Tags: Health

पुढील बातम्या