मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /अनियमित मासिक पाळीचा त्रास आहे? असू शकते 'चॉकलेट सिस्ट'चे लक्षण, अशी घ्या काळजी

अनियमित मासिक पाळीचा त्रास आहे? असू शकते 'चॉकलेट सिस्ट'चे लक्षण, अशी घ्या काळजी

अनेकदा महिलांना मासिक पाळी वेळेवर येत नाही. याची अनेक कारणं असतात. यातीलच एक कारण असू शकते एन्डोमेट्रिऑसिस (Endometriosis). ज्याला चॉकलेट सिस्ट (Chocolate Cyst) असेही म्हणतात.

अनेकदा महिलांना मासिक पाळी वेळेवर येत नाही. याची अनेक कारणं असतात. यातीलच एक कारण असू शकते एन्डोमेट्रिऑसिस (Endometriosis). ज्याला चॉकलेट सिस्ट (Chocolate Cyst) असेही म्हणतात.

अनेकदा महिलांना मासिक पाळी वेळेवर येत नाही. याची अनेक कारणं असतात. यातीलच एक कारण असू शकते एन्डोमेट्रिऑसिस (Endometriosis). ज्याला चॉकलेट सिस्ट (Chocolate Cyst) असेही म्हणतात.

मुंबई, 7 जुलै : मासिक पाळीदरम्यान (Menstrual Cycle) महिलांना अनेक त्रासाचा सामना करावा लागतो. पाळीदरम्यान (Periods) पोट आणि पायांमध्ये अतीव वेदना होणे, डोकेदुखी मळमळ अशा अनेक समस्या महिलांना जाणवतात. अनेकदा महिलांना मासिक पाळी वेळेवर येत नाही. याची अनेक कारणं असतात. यातीलच एक कारण असू शकते एन्डोमेट्रिऑसिस (Endometriosis). ज्याला चॉकलेट सिस्ट (Chocolate Cyst) असेही म्हणतात. याची अनेक लक्षणे असू शकतात. जसे की, जळजळ, संभोगादरम्यान किंवा नंतर वेदना, पाठीच्या खालच्या भागात दुखणे, अत्यंत समस्याप्रधान कालावधी, जास्त रक्तस्त्राव, थकवा, नैराश्य/चिंता आणि मळमळ यांचा समावेश होतो.

काय आहे चॉकलेट सिस्ट (What Is Chocolate Cyst)

एखाद्या महिलेला जास्त रक्तस्त्रावा बरोबर ओटीपोटात दुखणे किंवा सूज येणे असे त्रास होऊ शकतात. ही लक्षणं (Symptoms Of Chocolate Cyst) चॉकलेट सिस्टची असू शकतात मात्र प्रत्येकवेळी हे त्यामुळेच होते असेही नाही. परंतु पाळीतील अनियमितता चॉकलेट सिस्टमुळे निरंतर राहू शकते. चॉकलेट सिस्टला वैद्यकीय भाषेत 'एन्डोमेट्रिऑसिस ऑफ ओव्हरी' (Endometriosis Of Ovary) किंवा 'ओव्हेरियन एन्डोमेट्रिओमा' (Ovarian Endometrioma) असे म्हणतात. हे सिस्ट अंडाशयाच्या आत वाढतात परंतु बहुतेकवेळा ते कर्करोग नसलेले असतात. ते द्रवाने भरलेले असतात आणि दिसायला वितळलेल्या चॉकलेटसारखे असतात. म्हणूनच त्यांना चॉकलेट सिस्ट असे नाव देण्यात आले आहे.

चॉकलेट सिस्टची समस्या असल्यास असा असावा आहार (Diet During Chocolate Cyst)

एन्डोमेट्रिऑसिसचा त्रास असल्यास आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणे आवश्यक असते. यासाठी तुम्हाला काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे लागते. जसे की, आहार, व्यायाम, झोपेचे चक्र आणि योग्य उपचार. तुमच्या आहारात भाज्या, धान्ये, फायबर, नट, शेंगा आणि बाजरी, अंबाडी, चिया सीड्स, अंडी आणि मासे हे काही महत्त्वाचे पदार्थ असावे. मात्र प्रक्रिया केलेले पदार्थ, लाल मांस, अल्कोहोल, जास्त चरबीयुक्त पदार्थ, साखरयुक्त पदार्थ खाणे टाळावेत.

Red Sandalwood Benefits : मधुमेहींसाठी खूप फायदेशीर असते लाल चंदन, त्वचेच्या 'या' समस्याही होतील दूर

पुरेशी झोप महत्वाची

त्याचबरोबर झोपेच्या वेळा पाळणे आणि पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे. जर तुमचे झोपेचे चक्र निरोगी नसेल आणि त्यामुळे हार्मोन स्रावाची पद्धत अनियमित होत असेल तर अंतःस्रावी प्रणालीवर विपरित परिणाम होतो. यामुळे स्थिती बिघडते ज्यामुळे शरीरात जळजळ वाढते आणि त्यामुळे वेदना होतात. दररोज रात्री किमान 8 तास झोपणे योग्य असते.

हेडफोन लावून मोठ्या आवाजात गाणी ऐकताय? वेळ निघून जाण्यापूर्वी व्हा सावध!

योग्य प्रमाणात व्यायाम

चालणे, पोहणे, योगासने आणि एरोबिक्समुळे वेदना कमी होण्यास खूप मदत होते. या व्यतिरिक्त महिलांनी कोणतीही कठोर कामे करणे टाळावे. स्वतःला जास्त ताण देऊ नये आणि सकारात्मक राहावे. हे एन्डोमेट्रिऑसिसमुळे येणारे नैराश्य आणि चिंतेमध्ये मदत करते. शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक आरोग्यही महत्त्वाचे आहे आणि दोन्हीची देखभाल केल्याने व्यक्तीचे दीर्घायुष्य सुधारण्यास मदत होते.

First published:

Tags: Health Tips, Lifestyle, Women