महिलांना Sanitary Napkin मोफत वाटणारी 'पॅडवुमन ऑफ काश्मीर'

महिलांना Sanitary Napkin मोफत वाटणारी 'पॅडवुमन ऑफ काश्मीर'

आजही ज्या काश्मिरात मासिक पाळीबाबत फारसं बोललं जात नाही. तिथं या महिलेनं एक चळवळच उभी केली आहे.

  • Share this:

काश्मीर, 21 एप्रिल : तुम्हाला अक्षय कुमारचा (Akshay Kumar) पॅडमॅन आठवत असेल. तो सिनेमा अरुणाचलम मुरुगनंथमच्या म्हणजेच खऱ्या पॅडमॅनच्या खऱ्या आयुष्यावर आधारलेला होता. पॅडमॅन (Padman) सिनेमामुळे मुरुगनंथम ‘आउट ऑफ दे वे’ कामाची माहिती झाली. आज आम्ही तुम्हाला पॅडवुमनची माहिती देणार आहोत. ही पॅडवुमन (Padwoman) आहे ‘कश्मीर की कली’. काश्मीरसारख्या भागात पाळीसारख्या विषयावर बोलले जात नाही. तिथं ही ‘पॅडवुमन’ जागृतीबरोबर मोफत पॅड वाटण्याचं काम करते.

श्रीनगरच्या (Shrinagar) नौशेरामध्ये राहणारी 28 वर्षांची इरफाना जर्गर (Irfana jerger). हे नाव आता श्रीनगरमध्ये फेमस झालं आहे. गेल्या 6 वर्षांपासून ती अथक परिश्रम घेत आपलं मिशन चालवत आहे. वडिलांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तिने गरीब लोकांच्या मदतीसाठी हे मिशन सुरू केलं. आता हा तिच्या आयुष्याचा ध्यास आहे.

इरफाना सांगते, "2014 मध्ये वडीलल गुलाम हसन जर्गर यांचं निधन झालं. त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी समाजसेवेची सुरुवात केली. मी श्रीनगर नगर प्राधिकरणमध्ये (SMC) कॉन्ट्रक्टवर (contractual) काम करते.  आर्थिक अडचणी असूनही मी कोणतीही सरकारी संस्था (Government) एनजीओ (NGO) कडून मदत घेत नाही"

(हे वाचा - कोविड सेंटरमधील महिलांचा एकटेपणा झाला दूर; सोबतीसाठी आल्या ‘कर्मचारी सखी’)

Your story च्या रिपोर्टनुसार आतापर्यंत इरफानाने श्रीनगर शहर परिसरात 15 सार्वजनिक शौचालयांमध्ये ‘सॅनिटरी पॅड किट’ वितरीत केले आहेत. गेल्या सात महिन्यात महिलांना 10 हजार सॅनिटरी पॅड वितरीत केले आहेत.  ‘Eva Safety Door’ हे तिच्या संस्थेचं नाव आहे. , 'Eva' चा अर्थ  'महिला'  आणि 'Safety Door' चा अर्थ सुरक्षेच्या दिशेला उघडणारा दरवाजा. काश्मीरच्या दुर्गम खेड्यात गरजू महिलांपर्यंत पोहोचणं हे इरफानाचं पुढचं लक्ष्य आहे.

इरफाना म्हणते,  "कोरोनाव्हायरसच्या प्रसारानंतर गेल्या वर्षी लॉकडाऊन दरम्यान त्यांच्याकडे आलेल्या बहुसंख्य स्त्रिया एकट्या माता, विधवा आणि अपंग होत्या. ज्यांचे उत्पन्नाचे कमी स्त्रोत होते. लॉकडाऊनमुळे त्यांचे सर्व आर्थिक स्रोत बंद झाल्यामुळे त्यांची आर्थिक समस्या दुप्पट झाली. गरजू स्त्रिया माझ्या घरी सॅनिटरी किट्स घेण्यासाठी येत असत. तर मुली आई-वडिलांना नॅपकिन्स घेण्यासाठी पाठवत. म्हणून मी सोशल मीडियावर अकाउंट तयार केलं आहे आणि तिथे मला बर्‍याच रिक्वेस्ट मिळतात. कॉल,मेसेजेसचे देखील येतात. रिक्वेस्ट आल्यावर घरपोच किट पोहचवते"

(हे वाचा - तुमचं आई-बाबा होण्याचं स्वप्नं हिरावतंय Soft Drink)

या पीरियड किटमध्ये मासिक पाळीतील स्वच्छतेसाठी अंडरगारमेंट्स आणि सॅनिटायझर्स व्यतिरिक्त सॅनिटरी नॅपकिन्स,अँटिस्पास्मोडिक्स आणि हात धुण्यासाठी साबण यांचा समावेश आहे.हे किट महिला वापरतात. त्यांना पाळीच्या काळातील स्वच्छतेचं महत्त्वही पटतं.

महिलांची मासिक पाळी काश्मीर खोऱ्यात आजही वर्जित विषय आहे. त्यामुळे इरफानाला श्रीनगरपाठोपाठ संपूर्ण काश्मीरमध्ये पाळीविषयी जागृती निर्माण करायची आहे.

Published by: News18 Desk
First published: April 21, 2021, 12:09 PM IST

ताज्या बातम्या