Home /News /lifestyle /

तुमचं आई-बाबा होण्याचं स्वप्नं हिरावतंय Soft Drink

तुमचं आई-बाबा होण्याचं स्वप्नं हिरावतंय Soft Drink

कोल्ड्रिंक्स, सोडा, फ्रेश फ्रूट ज्यूस, ग्लुकोज, रिफाइंड आणि पॅक्ड फूड यामुळे रक्तातील साखरेची पातळी आणि युरिक ऍसिड वाढण्याची शक्यता असते. साधारण वयाच्या तिशीनंतर हा आजार होतो.

कोल्ड्रिंक्स, सोडा, फ्रेश फ्रूट ज्यूस, ग्लुकोज, रिफाइंड आणि पॅक्ड फूड यामुळे रक्तातील साखरेची पातळी आणि युरिक ऍसिड वाढण्याची शक्यता असते. साधारण वयाच्या तिशीनंतर हा आजार होतो.

बाळाचं प्लॅनिंग करत असाल तर असे ड्रिंक्स टाळले पाहिजेत.

    मुंबई, 20 एप्रिल : फिजी ड्रिंक्स (Fizzy Drinks) किंवा डाएट कोला (Diet Cola) प्यायला अनेकांना आवडतं. कॉफी किंवा चहा तर गोडंच हवा असं काहींचं म्हणणं असतं. पण हेच सॉफ्ट ड्रिंक आणि साखर घातलेला चहा किंवा कॉफी प्रेग्नसी प्लॅनिंगचे दुश्मन आहेत. या पदार्थांमध्ये गोडवा (Sweetner)  निर्माण करणाऱ्या कृत्रिम (Artificial) वस्तूंचा वापर केलेला असतो. प्रेग्नन्सीचा विचार करणाऱ्या जोडप्यांना अनेक गोष्टींकंडे लक्ष द्यायला हवा. पोषक आहार, व्यायाम याबरोबर आरोग्याला घातक असणारे कोल्ड्रिंक यांचं सेवन टाळावं. रोज सॉफ्ट ड्रिंक घेणं टाळायला हवं. सोडा किवा डाएट ड्रिंक तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत. एका रिसर्चनुसार पुरुष आणि महिलांच्या फर्टिलिटी पॉवर म्हणजे प्रजनन क्षमतेवर दररोज सोडा किंवा डाएट ड्रिंक पिण्याचा वाईट परिणाम होतो. या ड्रिंकच्या सेवनाने महिला आणि पुरुषांची 20 ते 25 टक्के प्रजनन क्षमता कमी होऊ शकते. IUI आणि IVF सारख्या फर्टिलिटी ट्रिटमेंटमध्येही अडचणी येतात. एका रिसर्चनुसार फर्टिलिटी ट्रीटमेंट (Fertility treatment) घेणाऱ्या महिलांवर शीतपेयांमध्ये आढळणाऱ्या Artificial sweeteners मुळे गर्भधारणेच्या क्षमतेवर परिणाम होऊन गर्भधारमेची क्षमता कमी होते.  जे पुरुष नियमितपणे सोड्याचं सेवन करतात त्यांच्या शुक्राणूंची संख्या कमी असते ज्याचा परिणाम प्रजननक्षमतेवर होतो. हे वाचा - कोविड सेंटरमधील महिलांचा एकटेपणा झाला दूर; सोबतीसाठी आल्या ‘कर्मचारी सखी’ सोडा एक अम्लीय (Acidic) पेय आहे. जे शरीरातली पीएच (PH) लेवल कमी करतं आणि प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. यात एस्पार्टेम (Aspartame) म्हणजे आर्टिफिशियल सॉफ्टनर (Artificial softener) आहे. ज्याचा वापर सॉफ्ट ड्रिंक्समध्ये केला गेला जातो. त्यामुळे हार्मोनल बॅलन्स (Hormonal balance) बिघडतो. जास्त सोडा सेवन केल्याने फ्री रेडिकल्स होतात, ज्यामुळे शुक्राणू निर्मिती आणि प्रजननक्षम बीज खराब होऊ शकतात. याव्यतिरिक्त बहुतेक शीतपेयांमध्ये कॅफिन असतं. त्यामुळे पीरियड्समध्ये होणारा रक्तस्राव कमी होतो. त्याने महिलांची फर्टिलिटी क्षमता कमजोर होत जाते. हे वाचा - कोरोना काळात काय खावं आणि काय नाही? WHO ने दिला आहाराबाबत सल्ला सोड्यामध्ये साखर जास्त प्रमाणात असते ज्यामुळे वजन वाढणं, लठ्ठपणा, अपचन सारख्या समस्या निर्माण होतात. सोडा आणि सॉफ्ट ड्रिंकमध्ये एडिटिव्स,प्रिझर्व्हेटिव्ह,कोलोरेंट्ससारखे केमिकल्स असतात. त्यामुळे प्रजजनक्षमता कमी होते. सोडा सेवनाने स्त्रियांमध्ये वंध्यत्व तर, पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होते. प्रजननक्षमतेवर वाईट परिणाम करण्याबरोबर गर्भधारणेच्या काळातही बर्‍याच समस्यांही होऊ शकतात. जास्त प्रमाणात सोडा सेवनाने शुगर लेव्हल वाढतं आणि टाइप -2 डायबेटीस होऊ शकतो. सोडा घेण्यामुळे शरीरातील इस्ट्रोजेनसह हार्मोनल पातळी बिघडते, ज्यामुळे गर्भधारणेत अडचणी येतात. सोडा आणि शीतपेय पिणं एखाद्या व्यसनासारखे आहे. हे पोटाच्या आरोग्यावर, हाडांच्या ताकदीवर आणि शरीराच्या विविध अवयवांवर नकारात्मक परिणाम करतं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips, Tea drinker

    पुढील बातम्या