Home /News /lifestyle /

कोविड सेंटरमधील महिलांचा एकटेपणा झाला दूर; सोबतीसाठी आल्या ‘कर्मचारी सखी’

कोविड सेंटरमधील महिलांचा एकटेपणा झाला दूर; सोबतीसाठी आल्या ‘कर्मचारी सखी’

'कर्मचारी सखी' साधतात महिला रुग्णांशी संवाद

'कर्मचारी सखी' साधतात महिला रुग्णांशी संवाद

कोरोनाग्रस्त महिलांना आजारापणाच्या मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी कर्मचारी सखी सरसावल्या आहेत.

    सोलापूर, 20 एप्रिल : कोरोना  रुग्णांना उपचाराबरोबरच मानसिक आधाराची गरज असते. जेव्हा आपल्याला कोरोना (corona) झाला आहे हे समजतं तेव्हा पेशंटला थोडं टेंन्शन येतं. त्यातही उपचारांसाठी कोव्हिड सेंटरमध्ये (Covid  Care Center) दाखल होणाऱ्या रुग्णांना आपल्या कुटुंबियांपासून लांब राहावं लागत असल्याने एकटेपणा जाणवायला लागतो. त्यांच्या याच अडचणींचा विचार करून सोलापूरमध्ये एक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. खासकरून महिलांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना आधार देण्यासाठी ‘कर्मचारी सखी’ (Staff Friend) नेमण्यात आल्या आहेत. सोलापूरमधील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे. पुरुष रुग्णांच्या तुलनेत महिला रुग्णांची संख्या जास्त आहे. महिला रुग्णांना पुरुष डॉक्टरांकडे आपल्या अडचणी मांडण्यात संकोच वाचतो. त्यामुळे ज्या महिला, तरुणींना आजारासंदर्भात वैयक्तिक अडचणी (Personal difficulties with the disease) मांडण्यात संकोच वाटत असेल त्यांना ‘कर्मचारी सखी’ मदत करतील. सोलापूर जिल्ह्यातील कोव्हिड केअर सेंटरमधील महिलांच्या मदतासाठी ‘कर्मचारी सखी’ काम करत आहेत. संबंधित परिसरातील महिला ग्रामसेविका कोरोना सेंटरमधील महिला रुग्णांची चौकशी करत त्यांच्या अडचणी जाणून घेतात. हे वाचा - 'कुणी माझ्या बाळाला दूध पाजेल?', कोरोनाने हिरावली आई; तान्हुल्यासाठी बापाची धडपड कोरोना रुग्णांना उपचारात कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी विविध उपक्रम राबवण्यात सोलापूर जिल्हा अग्रेसर राहिला आहे.  ‘कर्मचारी सखी’ नियुक्त करणारा सोलापूर हा पहिला जिल्हा आहे. सोलापूर जिल्ह्यात 23 कोव्हिड सेंटर आहेत. माळशिरस तालुक्यात दोन सेंटर आहेत. प्रत्येक सेंटरमध्ये एकूण रुग्ण संख्येच्या तुलनेत 30 ते 40 टक्के महिला आहेत. काही सेंटरमध्ये गरोदर महिला आहेत. त्या महिलांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी डॉक्टरांपर्यंत पोहचवण्याचं काम या कर्मचारी सखी करत आहेत. कोरोना रुग्णांचं मानसिक आरोग्य चांगलं राहावं, त्यांना आजारपणातून बाहेर पडता यावं यासाठी विविध खेळही या उपक्रमाअंतर्गत राबवले जातात. काचाकवड्या, गजगे, जिभल्या या पारंपारिक खेळांबरोबर कॅरमसारखे आधुनिक खेळ आणि भरतकाम, विणकाम यांचं साहित्य पुरवण्याचीही योजना या उपक्रमाअंतर्गत आहे. हे वाचा - आता फक्त एका Blood Test वरून होणार Depression चं निदान दिव्य मराठीच्या रिपोर्टनुसार सोलापूर जिल्ह्यातील मोहळ तालुक्यातील लांबोटी केंद्रातील 3 गरोदर मातांना ‘कर्मचारी सखी’मुळे मदत मिळाली आहे. या ‘कर्मचारी सखी’ रुग्णांशी संवाद साधताना सोशल डिस्टंसिंगचं पालन करतात. स्वत:च्या सुरक्षेचीही काळजी घेतात.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona, Corona patient, Solapur, Solapur news

    पुढील बातम्या