Home /News /lifestyle /

International Yoga Day 2022: तुम्हाला दिसायचं कमी आलंय का? ही 4 योगासनं करा, डोळ्यांच्या समस्या होतील दूर

International Yoga Day 2022: तुम्हाला दिसायचं कमी आलंय का? ही 4 योगासनं करा, डोळ्यांच्या समस्या होतील दूर

Yoga For Healthy Eyes: तुम्हाला दिसायचं कमी आलंय का? ही 4 योगासनं करा, डोळ्यांच्या समस्या होतील दूर

Yoga For Healthy Eyes: तुम्हाला दिसायचं कमी आलंय का? ही 4 योगासनं करा, डोळ्यांच्या समस्या होतील दूर

Yoga For Healthy Eyes: लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर तासनतास काम केल्याने आरोग्यावर परिणाम तर होतोच, पण डोळ्यांवरही वाईट परिणाम होतो. डोळ्यांवर ताण येऊन दृष्टी झपाट्याने कमकुवत होऊ लागते. त्यामुळेच डोळ्यांची काळजी घेणं गरजेचं आहे.

  मुंबई, 18 जून : डोळे निरोगी असतील तर प्रत्येक रंग सुंदर आणि प्रत्येक गोष्ट सुंदर असते. ज्या डोळ्यांनी आपण जग पाहतो, त्या डोळ्यांची काळजी (Eye Caring Tips) घेण्यात आपण खूप निष्काळजीपणा करतो. त्यामुळे डोळ्यांच्या समस्या वाढतात. तुम्हाला माहित आहे का की काही योगासनं आणि टिप्सच्या मदतीने आपण डोळ्यांची चांगली काळजी घेऊ शकतो. लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर तासनतास काम केल्याने आरोग्यावर परिणाम तर होतोच, पण डोळ्यांवरही वाईट परिणाम होतो. डोळ्यांवर ताण येऊन दृष्टी झपाट्याने कमकुवत होऊ लागते. त्यामुळेच डोळ्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. आज आपण सुप्रसिद्ध योग प्रशिक्षक मृदुला शर्मा यांनी दृष्टी सुधारण्याशी संबंधित सुचविलेल्या योगासनांविषयी माहिती जाणून घेणार आहोत. डोळ्यांसाठी फायदेशीर ठरणारी योगासने (Yoga For Healthy Eyes): 1.चक्रासन - याला 'व्हील पोज' असेही म्हणतात. अनेक लोकांना तासनतास स्क्रीनकडे पाहत राहावं लागतं आणि त्यामुळे त्यांची दृष्टी खराब होऊ लागते. अशा लोकांनी चक्रासन करावे. हे आसन केल्याने दृष्टी सुधारते. 2. सर्वांगासन- हे आसन केल्याने डोळ्यांची सुद्धा काळजी घेता येते. हे आसन केल्याने डोक्याकडे रक्ताभिसरण वाढते, त्यामुळे डोळेही चांगले राहतात. परंतु हे योगासन करण्यापूर्वी सराव करणे गरजेचं आहे. हेही वाचा: भूक मंदावणे, पचनक्रिया बिघडण्याची काय आहेत कारणं? आहारतज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या 3. बकासन- हे आसन करण्यासाठी संतुलन राखणं फार महत्वाचे आहे. या आसनात 30-60 सेकंद स्थिर राहता यायला हवं. हे आसन करताना डोक्याचा भाग जमिनीकडे आणि संपूर्ण शरीर जमिनीच्या वर राहते. हे आसन केल्याने डोळ्यातील रक्तप्रवाह चांगला राहतो. 4.अनुलोम विलोम- या प्राणायामाचा तुमच्या दिनक्रमात समावेश करून, तुम्ही वेदना, जळजळ आणि डोळे अंधुक होण्यासारख्या समस्यांपासून मुक्त होऊ शकता. हा प्राणायाम करत असताना काही सेकंदांसाठी श्वास रोखून धरला जातो, त्यादरम्यान हवा मेंदूच्या नसांपर्यंत पोहोचते आणि डोळ्यांना आराम मिळतो. हेही वाचा: Turmeric: आजारी पडू नये म्हणून दुधात हळद घालून पिणं आहे फायदेशीर; अशा पद्धतींनी वापरू बघा या टिप्स फॉलो करा-
  • ठराविक वेळाने, स्क्रीनवरून डोळे हटवा आणि आपल्या सभोवतालच्या गोष्टी पहा.
  • एक ते दोन तासांच्या अंतराने डोळ्यात थंड पाण्याचा शिडकावा करत राहा.
  • अर्ध्या तासाच्या अंतराने तळहातांना डोळ्यांवर ठेवा.
  • दरम्यान 10-15 सेकंद डोळे बंद ठेवा.
  • डोळ्यांच्या नियमित तपासणीबाबत निष्काळजी राहू नका.
  Published by:user_123
  First published:

  Tags: Eyes damage, Health Tips, Yoga day

  पुढील बातम्या