मुंबई, 18 जून : हळदीचा वापर आपल्या स्वयंपाकघरात अनेक पदार्थांमध्ये दररोज केला जातो. यामुळे पदार्थांची चव तर वाढवतेच आणि अन्नाचा पोतही सुधारतो. हेल्थलाइन च्या माहितीनुसार हा पिवळ्या रंगाचा मसाला आयुर्वेदात हजारो वर्षांपासून औषध म्हणून वापरला जात (Different Uses Of Turmeric in diet) आहे. हळदीमध्ये मुबलक प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. शरीराला सर्व प्रकारच्या संक्रमण आणि रोगांपासून वाचवण्यास ते मदत करतात. इतकंच नाही तर जखम, वेदना कमी करण्यासाठी किंवा त्वचेची कोणतीही समस्या दूर करण्यासाठी घरगुती उपायांमध्ये हळद वापरली जाते. आहारात भाज्या किंवा डाळींव्यतिरिक्त हळदीचा वापर करायचा असेल, तर त्याविषयी जाणून घेऊया. अशा प्रकारे आहारात हळदीचा समावेश करा - गोल्डन मिल्क - गोल्डन मिल्क म्हणजे हळदीचे दूध. दुधात हळद घालून प्यायल्याने आपण हंगामी फ्लू, खोकला आणि सर्दीपासून बचाव करू शकता. याशिवाय, हाडे मजबूत करण्यास आणि शरीरातील वेदना कमी करण्यास हळदीचा फायदा होतो. गरम दुधात एक छोटा चमचा हळद मिसळून प्या. हळदीची सॅलाड - हळदीमध्ये मुबलक प्रमाणात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीराला अनेक संक्रमणांपासून संरक्षण मिळते. सकाळी सॅलडमध्ये मीठासोबत हळद टाकून खाल्ल्यास त्याचा फायदा दुपटीने होतो. गोल्डन राईस - भात शिजवताना त्यात हळद घातली तर ते दिसायला छान वाटते. हळदीमुळे चव वाढवण्यासोबतच हा तांदूळ आरोग्यासाठी गुणकारी ठरतो. हे वाचा - मुलांच्या मेंटल ग्रोथसाठी या टिप्स आहेत उपयोगी; लहान असल्यापासूनच होईल फायदा हळदीचा चहा - आपल्याला बदलत्या ऋतूमध्ये चहा प्यायला आवडत असेल, तर तुम्ही चहाला अधिक आरोग्यदायी बनवण्यासाठी त्यात कच्ची हळद उकळू शकता. सर्दी, खोकला-पडसं, शिंका येणे इत्यादीपासून आपले संरक्षण होईल आणि तुमची प्रतिकारशक्ती देखील मजबूत करेल. हे वाचा - डोळ्यांच्या पापण्या फडफडण्याचा अर्थ काय? धार्मिक आणि वैज्ञानिक कारण समजून घ्या हळदीचा हलवा - गरम पातेल्यात दोन चमचे तूप टाका आणि ते गरम झाल्यावर त्यात 2 चमचे हळद घाला. भाजल्यावर त्यात किसलेले आले आणि 2 चमचे साखर घाला. आच मंद ठेवा आणि सुगंध यायला लागल्यावर त्यात एक वाटी पाणी टाका आणि ते सुकेपर्यंत ढवळत राहा. या मिश्रणामुळे आपली प्रतिकारशक्ती मजबूत होईल आणि अॅलर्जीची समस्या कमी होईल. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.