मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /किस करताना जरा जपून! हे आहेत French Kiss चे साइड इफेक्ट्स

किस करताना जरा जपून! हे आहेत French Kiss चे साइड इफेक्ट्स

किस केल्यान हार्पीस इन्फेक्शन सारखं व्हायरल इन्फेक्शन होऊ शकतं.

किस केल्यान हार्पीस इन्फेक्शन सारखं व्हायरल इन्फेक्शन होऊ शकतं.

प्रेम व्यक्त करण्यासाठी किस (Kiss) करत असाल तर, आधी त्याचे दुष्परिणाम (Side Effect) जाणून घ्या.

नवी दिल्ली, 20 जून: प्रेमात असलेल्यांसाठी सगळे दिवस सारखे असतात. ज्या दिवशी जोडीदाराबरोबर (Partner) प्रेमळ संवाद, भेट होते. तो दिवस त्यांच्यासाठी सगळ्यात सुंदर दिवस असतो. प्रेमीयुगूल आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणतीही संधी सोडत नाहीत. बॉडफ्रेन्ड किंवा गर्लफ्रेन्डचा वाढदिवस, पहिल्यां भेटीचा दिवसं किंवा जेव्हा प्रेम व्यक्त केलं तो दिवस. त्यांच्यासाठी महत्वाचे असतात शिवाय. रोज डे, चॉकलेट डे, व्हॅलेंटाईन डे  (Valentine Day) तर, त्यांच्यासाठी फार महत्वाचे असतात. व्हॅलेंटाईन डे फेब्रुवारी (February) महिन्यात येत असल्यामुळेचं या दिवसाला खास महत्व आहे. व्हॅलेंटाईन डे केवळ परदेशातच नही तर, भारतातही साजरा केला जातो. पण, व्हॅलेंटाईन डेच्या आदल्या दिवशी म्हणजे 13 फेब्रुवारीला किस डे (Kiss Day) साजरा केला जातो. या दिवशी प्रेमात असलेले लोक त्यांच्या जोडीदाराल चुंबन देऊन त्यांचं प्रेम व्यक्त करतात.

प्रत्येकासाठी आपल्या आयुष्यातल पहिलं किस खास असतं. हा अनुभव त्यांच्यासाठी आयष्यभर लक्षात राहणारा असतो. कोणी फ्रेन्च किस (French Kiss) करतं, तर कोणी लीप किस आणि कोणी गालावर किस करतात. पण, जोडीदाराल किस करण्याआधी काही महत्वाच्या गोष्टी माहिती करून घ्या. कारण, एक किसमुळे काही गंभीर आजारही होऊ शकतात.

किसमुळे होणारे दुष्परिणाम

इन्फ्लुएंजा इन्फेक्शन

इन्फ्लुएंजा झालेल्या व्यक्तींनी चुकूनही कोणालाच किस करू नये. हे इन्फेक्शन आपल्या तोडांवाटे लाळेमधून पसरतं. त्यामुळे किस केल्यावर आपल्या पार्टनरलही इन्फ्लुएंजा इन्फेक्शन होऊ शकते. त्यामुळे अंगदुखी, ताप, डोकेदुखी आणि घशात खवखव होणं असे त्रास होऊ शकतात.

हार्पीस इन्फेक्शन

किस केल्यान हार्पीस इन्फेक्शन सारखं व्हायरल इन्फेक्शन होऊ शकतं. यामुळे तोंडाच्या आसपासच्या भागात लाल रंगाचे चट्टे उठतात.

अल्सर

किसमुळे सिफलिस नावाचा त्रास होतो. हा एक प्रकारचा तोंडाचा अल्सर आहे. तोंडाचा अल्सर झाल्यास   खाण्यापिण्यात त्रास होतो.

मॅनिंजायटिस बॅक्टेरिया

आपल्या जोडीदाराप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी किस करत असाल तरी, त्यामुळे बॅक्टेरियल इन्फेक्शन  होऊ शकतं हे लक्षात घ्या. यामुळे मॅनिंजायटिस बॅक्टेरिया (Meningitis Bacteria) पसरतो. त्यामुळे घसा दुखणे, ताप आणि डोकेदुखीचा त्रास होतो.

बॅक्टेरिया

बऱ्याचजणांना हिरड्या आणि दातांसंबंधी त्रास असतात. त्यामुळे अशा व्यक्तीला किस केल्यामुळे  आपल्याही तोंडात बॅक्टेरिया पसरू शकतो. त्यामुळे तोंडांसबंधी त्रास होऊ शकतात.

First published:

Tags: Side effects, Valentine day