काय आहे नेहा कक्करचं ब्युटी सिक्रेट? आवाजाबरोबर चेहऱ्याचीही घेते अशी काळजी

काय आहे नेहा कक्करचं ब्युटी सिक्रेट? आवाजाबरोबर चेहऱ्याचीही घेते अशी काळजी

नेहा आवाजाप्रमाणे सौंदर्याचीही काळजी घेतात. त्यासाठी आहाराकडे जास्त लक्ष देतात.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 जून: प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) हे नाव सगळ्यांनाच परिचीत आहे. तिच्या गायकीचे (Singing) लाखो दिवाने आहेत. पण, नेहाच्या सौंदर्य आणि स्माईलवर (Beauty & Smile) कितीतरी जणं फिदा आहेत. प्रत्येक गायकाला दररोज रियाज करावा लागतो. नेहा सारख्या सेलिब्रेटींना (Celebrity) त्यांच्या आवाजाबरोबर चेहऱ्याचीही काळजी (Skin Care) घेतात.

टी-ट्री ऑईल

चेहऱ्याच्या त्वचेसाठी नेहा टी-ट्री ऑईल वापरते. टी-ट्री ऑईल त्वचेवर लगेच काम करायला सुरूवात करतं. एखादा फेसपॅक किंवा तेल यात मिसळून लावल्याने फायदा होतो. यामुळे चेहरा उजळतो, डाग जातात आणि त्वचा नितळ बनते.

नेहा आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देते. त्या नेहमी हेल्दी फुड खाते.

नेहा कक्कर पार्टी लव्हर आहे. कामामधून मिळालेला रिकामा वेळ ती एन्जॉय करण्यात घालवते. त्याचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करत असते. शिवाय काही खास टिप्सही चाहत्यांना देत असते. चेहरा चांगला रहावा यासाठी तणावापासून दूर राहण्याचा सल्ला ती नेहमी देते. तर, हेल्दी डाएट घेतल्यास चेहरा आपोआप खुलतो असं तिचं म्हणणं आहे.

हेल्दी डाएट

नेहा नेचर लव्हर आहे. तिला ऑरगॅनिक फूड खायला आवडतं. दिवसाची सुरूवात फळांच्या रसाने करते. नेहा लिक्वीड डाएटकडे लक्ष देते. ज्युस, शेक, स्मुदी प्यायला आवडत असल्याने पार्टीमध्येही हेल्दी ड्रिंक्सच घेते.

नारळ पाणी

नेहाल नारळ पाणी प्यायला आवडतं. नारळ पाण्यात भरपूर व्हिटॅमीन्स आणि मिनरल्स असतात. त्यामुळे स्किन हायड्रेट राहते, केसांची चमक वाढते. त्यामुळे नेहा नेहमी नारळपाणी पिेते आणि त्वचा आणि केसांवरही नारळपाणी लावते.

कॉफी

नेहाला कॉफी प्यायला आवडते. कॉफीमुळे स्ट्रेस कमी होतो. मनावर तणाव वाढल्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. त्यामुळे नेहा कॉफी आवडीने पिते पण, त्याचे साईडइफेक्ट माहिती असल्याने प्रमाणातच घेते.

घरचं जेवण

बिझी शेल्ड्यूल मुळे नेहा सारख्या सेलिब्रेटींना आहाराकडे लक्ष देता येत नाही. पण, नेहाला घरचं जेवण जास्त आवडतं. बाहेरचं जेवण चविष्ट वाटलं तरी, ते खुप तेलकट आणि तिखट असतं. तर, कशा वातावरणात बनवलं आहे याची माहितीही नसते. त्यामुळे नेहा घरच जेवण खाण्याचा सल्ला देते.

Published by: News18 Desk
First published: June 20, 2021, 5:16 PM IST

ताज्या बातम्या