मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Kama Gizmos : भारतातील पहिलं सेक्स टॉईज स्टोअर; पाहा नेमकं आहे तरी कसं

Kama Gizmos : भारतातील पहिलं सेक्स टॉईज स्टोअर; पाहा नेमकं आहे तरी कसं

आतापर्यंत सेक्स टॉईजची (sex toy) ऑनलाईन विक्री  होत होती.

आतापर्यंत सेक्स टॉईजची (sex toy) ऑनलाईन विक्री होत होती.

आतापर्यंत सेक्स टॉईजची (sex toy) ऑनलाईन विक्री होत होती.

    गोवा, 16 मार्च :  फक्त परदेशातच नव्हे तर भारतातही सेक्स टॉईजचा (Sex Toys) वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पण या सेक्स टॉईजची विक्री सामान्यपणे ऑनलाईनच केली जाते. भारतात 2020 मध्ये लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या (Lockdown) काळात सेक्स टॉईजची मागणी 65 टक्क्यांनी वाढली होती. मागणी वाढली असली तरी या क्षेत्रात मोजक्याच वेबसाइट सेक्स टॉईज उपलब्ध करतात. अन्य काही ठिकाणी बेकायदेशीररीत्या अशा गोष्टींची विक्री केली जाते. आता मात्र देशातील पहिलं मान्यता प्राप्त सेक्स टॉईजचं दुकानही (Sex Toys Store)  सुरू झालं आहे. गोव्यातील (Goa) कलंगुट (Calangute) इथं भारतातील पहिलं सेक्स टॉईज स्टोर उभं राहिलं आहे.

    कामा गिझ्मोस (Kama Gizmos) असं या दुकानाचे नाव असून इथं सेक्स टॉईज आणि औषधं मिळतात. हे देशातलं सेक्स टॉईजचं पहिलं दुकान (First in country) आहे. 14 फेब्रुवारी रोजी या दुकानाचा शुभारंभ झाला. कामाकार्ट (kamakart) आणि गिज्मोसवाला (Gizomoswala) या दोन सेक्स टॉईज क्षेत्रातील स्पर्धकांनी एकत्र येत हे दुकान सुरू केलं आहे, असं वृत्त व्हाईस डॉटकॉमनं दिलं आहे.

    हे वाचा - एकुलता एक म्हणून वाढला, 2 दिवसांतच मिळाली 30 भावंडं; काय आहे प्रकरण?

    कामा गिझ्मोस हे कायदेशीर मान्यताप्राप्त दुकान असून इथं सेक्स टॉईजची तसंच अन्य उत्पादनांची अतिशय वैविध्यपूर्ण श्रेणी उपलब्ध आहे. यामध्ये व्हायग्रा स्प्रे, दर्जेदार कंडोम्स, जेल्स, पंप अशा असंख्य गोष्टी मिळतात. ग्राहकांना वस्तू स्वतः बघून घेण्याची सुविधा इथं मिळते. एखाद्या डिपार्टमेंटल स्टोअरसारखा याचा लूक असून अतिशय उत्तम रचना करण्यात आली आहे.

    " isDesktop="true" id="531247" >

    अंधारे किंवा अतिशय चमकदार, बटबटीत दुकान करण्याऐवजी परदेशातील दुकानांप्रमाणे सजावट करण्यावर भर दिला असल्याचं या दुकानाचे सहसंस्थापक नीरव मेहता (Neerav Mehta) यांनी सांगितलं.

    हे वाचा - हे चॅलेंज फक्त महिलांनाच जमतंय पुरुषांना का नाही?

    ‘एखाद्या औषधाच्या दुकानाप्रमाणे (Medical Store) आम्ही याची रचना केली असून आमची सर्व कायदेशीर प्रमाणपत्रे इथल्या भिंतीवर लावली आहेत. कोणतीही राजकीय प्रतिक्रिया यावर उमटू नये यासाठी आम्ही हे धोरण ठेवले आहे, असंही त्यांनी सांगितलं. सेक्स स्टोअर्स आणि उत्पादनं आजही कायद्याच्या दृष्टीनं ‘ग्रे स्पेस’मध्ये आहेत. त्यामुळं कामा गिझ्मोसमधील उत्पादनांवर कुठेही नग्नता दिसणार नाही याची दक्षता घेतली जाते. अश्लीलताविषयक कायद्याचा (Obscenity Law) कुठेही भंग होणार नाही याची काळजी आम्ही घेतो. सेक्स टॉईज आणि उत्पादनांचे पॅकेजिंग करताना नग्नता किंवा स्त्रीचे मर्यादाभंग करणारे चित्रण नाही हे बघितले जाते. अशा प्रकारचे पॅकेजिंग नसलेलीच सेक्स टॉईज आणि उत्पादनं निवडली जातात, असंही मेहता यांनी स्पष्ट केलं.

    First published:
    top videos

      Tags: Goa, Lifestyle, Sex