मुंबई, 13 ऑगस्ट : भारतात धार्मिक सणांसोबतच अनेक राष्ट्रीय दिवसही उत्साहात आणि मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात. आपल्या देशात स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनासारख्या प्रसंगी शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयांमध्ये कार्यक्रम आयोजित केले जातात. राष्ट्रीय सण जवळ आला की शाळेतील शिक्षक आणि मुलांची तयारी सुरू होते. मुलांना त्यांच्या देशाची जाणीव व्हावी आणि अभ्यासाबरोबरच इतर क्षेत्रातही त्यांची प्रतिभा वाढावी यासाठी शाळांमध्ये असे कार्यक्रम आयोजित केले जातात. यावर्षी आपण 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत. ज्यासाठी मुलांची तयारी जोरात सुरू आहे. त्यामुळे अनेक मुले पहिल्यांदाच स्वातंत्र्यदिनी भाषण करण्यास घाबरू शकतात. जर तुमचे मूल पहिल्यांदाच सर्वांसमोर भाषण देणार असेल तर तुम्ही काही टिप्स वापरून त्यांना मदत करू शकता. पालकांनी भाषण लिहिण्यात मुलाना अशी करा मदत भाषणाच्या विषयाची निवड भाषण लिहिण्यासाठी, सर्वप्रथम एक विषय निवडणे आवश्यक आहे. मुलांना विषय निवडण्यास मदत करा आणि लक्षात ठेवा की विषय कार्यक्रमानुसार असावा आणि ऐकणारा त्याच्याशी संबंधित असेल.
Baby Oral Hygiene : बाळाच्या तोंडाची स्वच्छता असते खूप गरजेची; आजार टाळण्यासाठी अशाप्रकारे स्वच्छ करा बाळाची जीभभाषणाचा विषय समजून घ्या कोणतेही भाषण किंवा स्पीच तयार करण्यापूर्वी त्याचा विषय आणि थीम नीट समजून घ्या आणि मुलांनाही समजावून सांगा. अभ्यास आवश्यक आहे मुलांना भाषण लिहिण्यास मदत करण्यापूर्वी, त्या विषयावरील सर्व माहिती आणि संशोधन गोळा करणे आवश्यक आहे. जेणेकरून आपण मुलांच्या भाषणात कोणतीही चुकीची किंवा अपूर्ण माहिती देऊ नये. Parenting Tips : मुलं जास्त वेळ स्क्रीन बघतात? मुलांच्या डोळ्यांची अशी घ्या काळजी, चष्मा लागणार नाही योग्य शब्द निवडणे मुलांना कठीण शब्द बोलणे आणि समजणे कठीण होऊ शकते. त्यामुळे मुलांना त्यांच्या भाषणात सोपे आणि योग्य शब्द निवडण्यास मदत करा.