मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Baby Oral Hygiene : बाळाच्या तोंडाची स्वच्छता असते खूप गरजेची; आजार टाळण्यासाठी अशाप्रकारे स्वच्छ करा बाळाची जीभ

Baby Oral Hygiene : बाळाच्या तोंडाची स्वच्छता असते खूप गरजेची; आजार टाळण्यासाठी अशाप्रकारे स्वच्छ करा बाळाची जीभ

अनेक पालक मुलाची जीभ स्वच्छ करण्याकडे विशेष लक्ष देत नाहीत. मात्र पालकांनी हे जाणून घेतले पाहिजे की नवजात बाळाच्या तोंडाच्या स्वच्छतेची काळजी घेणेदेखील त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी महत्वाचे आहे.

  • Published by:  Pooja Jagtap
मुंबई, 7 ऑगस्ट : नवजात बालकाची आपण खूप काळजीपूर्वक देखभाल करत असतो. त्याच्या शारीरिक स्वच्छतेपासून ते बाळाच्या सभोवतालच्या स्वच्छतेकडेही आपण व्यवस्थित लक्ष देत असतो. मात्र एक छोटीशी पण खूप महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे बाळाच्या जिभेची स्वच्छता. नवजात बाळ जन्मापासून किमान सहा महिने आईच्या दुधाऐवजी काहीही खात पीत नाही. त्यामुळे अनेक जणांना असे वाटते की बाळाच्या तोंडाची स्वच्छता वेगळी अशी करण्याची गरज नाही. परंतु असे नसते. बाळाचे दात जन्मानंतर काही महिन्यांनी यायला लागतात. पण दात येण्यापूर्वीच बाळाच्या तोंडाच्या स्वच्छतेची काळजी घेणे गरजेचे असते. याकडे लक्ष न दिल्यास मुलाच्या आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. मात्र नवजात बाळाची जीभ साफ करणे इतके सोपे नाही. जेव्हा जेव्हा पालकांना असे काही करावेसे वाटते तेव्हा मुले रडून अस्वस्थ होतात. आज आम्ही तुम्हाला बाळाची जीभ साफ करण्यासाठी काही टिप्स देणार आहोत. ज्यामुळे बाळांना त्रास होणार नाही आणि तुम्हीही शांततेने त्यांच्या तोंडाच्या स्वच्छतेची काळजी घेऊ शकता. बाळाची जीभ कशी स्वच्छ करावी - हेल्थलाइनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सर्वप्रथम तुम्ही तुमचे हात स्वच्छ धुवावे. नंतर स्वच्छ सूती कापड घ्या आणि ते कोमट पाण्यात भिजवा. हे कापड तुमच्या बोटाला गुंडाळा आणि याने बाळाची जीभ हळुवार स्वच्छ करा. - बाळाचे तोंड हळू हळू उघडा आणि जीभ स्वच्छ करण्यासाठी तुमचे बोट आत न्या. बोट तोंडात घातल्यानंतर ते हळूवारपणे जिभेवर वर्तुळाकार फिरवा. - जर तुमच्या मुलाचे दात आले असतील तर ते कापडाच्या साहाय्याने आरामात स्वच्छ करता येतात.

कमी वेळात लहान वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्यासाठी या पद्धती वापरून पहा

- लहान मुलांच्या तोंडात जमा होणारा बिल्ड-अप काढून टाकण्यासाठी तुम्ही डिंक क्लिनर देखील वापरू शकता. मात्र जर क्लिनर बिल्ड-अप योग्यरित्या काढू शकत नसतील, तर तुम्ही यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. - मुलांचे तोंड स्वच्छ करताना त्याच्या जिभेवर पांढरी लेयर आहे का ते पहा. हे ओरल थ्रश असू शकते. असे आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांना भेटा. - जबरदस्तीने जीभ स्वच्छ करण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे बाळाला दुखापत होऊ शकते. - बाळाला खायला दिल्यानंतर तोंड पूर्णपणे स्वच्छ करा आणि दिवसातून एकदा त्याची जीभ स्वच्छ करा.

पचनशक्ती मजबूत करण्यासाठी फॉलो करा या टिप्स; बद्धकोष्ठतेचा त्रास होईल दूर

- बाळाच्या तोंडात बोट घालण्याआधी तुमची नखे कापलेली आहेत, ना याची खात्री करून घ्या. कारण यामुळे तोंडाच्या संसर्गाचा धोका वाढतो. - बाळाचे दात आल्यानंतर त्यांना तपासणीसाठी दंतवैद्याकडे घेऊन जा. तसेच डॉक्टरांना विचारल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार फिंगर टूथब्रश किंवा टंग क्लीनर वापरा.
First published:

Tags: Health Tips, Lifestyle, Small baby

पुढील बातम्या