मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Parenting Tips : मुलं जास्त वेळ स्क्रीन बघतात? मुलांच्या डोळ्यांची अशी घ्या काळजी, चष्मा लागणार नाही

Parenting Tips : मुलं जास्त वेळ स्क्रीन बघतात? मुलांच्या डोळ्यांची अशी घ्या काळजी, चष्मा लागणार नाही

आजकाल लहान वयात मुलांनी चष्मा लावणे खूप सामान्य झाले आहे. मुलांची दृष्टी वाढवण्यासाठी त्यांच्या आहाराबरोबरच त्यांच्या शारीरिक हालचालींकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.

  • Published by:  Pooja Jagtap
मुंबई, 27 जुलै : सामान्यतः असे म्हटले जाते की वाढत्या वयाबरोबर डोळ्यांची दृष्टी कमी होऊ लागते आणि अशा परिस्थितीत बहुतेक वृद्धांना चष्मा वापरावा लागतो. पण आजकाल सर्व वयोगटातील लोकांना चष्मा लागणे सामान्य झाले आहे. रिफ्रॅक्टीव्ह एरर दृष्टी कमकुवत होण्याचे कारण आहे. ज्यामध्ये डोळा रेटिनावर लक्ष केंद्रित करू शकत नाही आणि डोळ्यांमधून अंधुक दृष्टी येते. आजू आम्ही तुम्हाला मुलांच्या डोळ्यांची काळजी घेण्यासाठी काही विशेष गोष्टी सांगणार आहोत. आजकालची मुलं शारीरिक हालचाली किंवा मैदानी खेळांमध्ये भाग न घेता मोबाईल, व्हिडिओ गेम्स आणि टेलिव्हिजनवर जास्त वेळ घालवतात. डोळ्यांची दृष्टी मुलांच्या पोषणावरही अवलंबून असते, त्यामुळे मुलांच्या वाढीच्या वर्षांत त्यांना केवळ डोळ्यांसाठीच नव्हे तर सर्वांगीण वाढीसाठी पोषक आहार देणे गरजेचे असते. सकस आहार आणि चांगली झोप मुलांच्या आहारात फळे, भाज्या, अंडी, मासे आणि दुग्धजन्य पदार्थ यासारख्या पौष्टिक गोष्टींचा समावेश करा. हे सर्व व्हिटॅमिन ए चे चांगले स्त्रोत आहेत जे मुलाचे डोळे निरोगी ठेवतात आणि अनेक आरोग्य फायदे देतात. मॉम्स जंक्शनच्या मते, मुलांसाठी चांगली झोप घेणे महत्वाचे आहे जेणेकरून डोळ्यांना आराम मिळेल आणि त्यांना विश्रांती मिळेल.

आईसोबत मूलही असतं क्युट आणि टॅलेंटेड? प्रेग्नन्सीत सेलिब्रिटी फॉलो करतात हा खास डाएट

चष्मा वापरणे जर मुलांची दृष्टी आधीच कमकुवत असेल तर त्यांनी कोणतीही स्क्रीन पाहताना चष्मा वापरणे आवश्यक आहे आणि चष्म्यांमध्ये फक्त चांगल्या दर्जाच्या लेन्स वापरा. फोन, कॉम्प्युटर आणि टीव्हीचा वापर कमीत कमी करण्याचा प्रयत्न करा आणि विशेषतः झोपेच्या काही तास आधी मुलांना स्क्रीनकडे पाहू देऊ नका. मुलांचा स्क्रीन टाइम एका दिवसात 1 तासापेक्षा जास्त नसावा.

या वयात पालकांनी मुलांसोबत झोपणं थांबवावं! एक्सपर्ट्सनी सांगितली कारणं

डोळ्यांची नियमित तपासणी मुलांनी दर 6 महिन्यांच्या अंतराने डोळ्यांची तपासणी करणे चांगले. असे केल्याने, डोळ्यातील बदल त्वरीत लक्षात येतात आणि ते निराकरण करणे सोपे जाते. समस्या वेळीच लक्षात आल्यास सोडवणे सोपे जाते.
First published:

Tags: Eyes damage, Health Tips, Lifestyle, Parents and child

पुढील बातम्या