मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /आईचे दूध प्यायल्यानंतरही बाळ राहाते भुकेले? या उपायांनी वाढवा दुधातील फॅट्स, बाळ होईल सुदृढ

आईचे दूध प्यायल्यानंतरही बाळ राहाते भुकेले? या उपायांनी वाढवा दुधातील फॅट्स, बाळ होईल सुदृढ

अनेक वेळा बाळाला दूध पाजल्यानंतरही ते रडायला लागते किंवा लगेच दूध पिण्याचा हट्ट करते. त्याचे पोट पूर्ण भरले नसेल. जर तुम्हाला अशी समस्या भेडसावत असेल तर जाणून घ्या दुधात फॅट वाढवण्याचे काही उपाय.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 6 फेब्रुवारी : फॅट्स हा बाळाच्या आहाराचा एक आवश्यक घटक आहे. जर बाळाला हे पोषक तत्व मिळाले नाही तर त्याला वारंवार भूक लागते आणि ते खूप अस्वस्थदेखील होते. फॅट केवळ मुलाचे पोट भरण्यासाठीच नाही तर त्याला ऊर्जा देण्यासाठी, त्याच्या मनाचा आणि शरीराचा विकास करण्यासही मदत करते. कधीकधी आईच्या दुधात फॅटचे प्रमाण खूप कमी होते.

दुधात फॅटचे प्रमाण कमी झाले की बाळाचे पोट भरत नाही. अशावेळी काही टिप्स तुम्हाला मदत करू शकतात. सर्वप्रथम आईच्या दुधात आढळणाऱ्या फॅट्सबद्दल जाणून घेऊ.

डिप्रेशनमधील मित्र-नातेवाईकांना अशी करा मदत, आत्महत्येचा विचार नाही येणार मनात

आईच्या दुधात असते फॅट

ट्रायग्लिसराइड्स, पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडस्, ओमेगा 3 फॅटी ऍसिडस्, ओमेगा 6 फॅटी ऍसिडस्, कोलेस्ट्रॉल आणि मोनोसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडस् यांसारखे फॅट्स आईच्या दुधात असतात.

फॅट वाढवण्यासाठी टिप्स

मॉमजंक्शननुसार, आईने बाळाला आधी एका बाजूचे दूध पाजावे. जोपर्यंत एका बाजूचे दूध पूर्णपणे संपत नाही तोपर्यंत बाळाला दुसऱ्या बाजूने पाजू नका. त्यामुळे दूध पुन्हा तयार होण्यास सुरुवात होईल आणि फॅटचे प्रमाणही सुधारू शकेल. जर बाळाने एका बाजूने पूर्ण दूध प्यायले नाही, तर ब्रेस्ट पंप वापरला जाऊ शकतो. जेणेकरून ते दूध नंतरसाठी साठवले जाऊ शकते.

ब्रेस्ट मालिश

स्तनपानादरम्यान किंवा नंतर स्तनाची मालिश केल्यास दुधाची नलिका साफ होण्यासही मदत होते. त्यामुळे चरबीचे प्रमाण वाढण्यास मदत होते. स्तनाच्या दाबाने फॅटी दूध मिळण्यास मदत होते.

सोशल मीडियावर भावनेच्या आहारी जाणं पडेल महागात, तरुणांनी घ्यायला हवी ‘ही’ काळजी

चांगले अन्न

आईचा आहार चांगला असला तरी आईच्या दुधात फॅटचे प्रमाण वाढू लागते, त्यामुळे आईने संतुलित आहार घ्यावा. आरोग्यदायी गोष्टींशिवाय बाहेरचे पदार्थ खाऊ नका.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

First published: