जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Diet For Nails: सुंदर, आकर्षक नखांसाठी आहारात या गोष्टी असाव्यात; तुटणार नाहीत, खुलेल हाताचं सौंदर्य

Diet For Nails: सुंदर, आकर्षक नखांसाठी आहारात या गोष्टी असाव्यात; तुटणार नाहीत, खुलेल हाताचं सौंदर्य

Diet For Nails: सुंदर, आकर्षक नखांसाठी आहारात या गोष्टी असाव्यात; तुटणार नाहीत, खुलेल हाताचं सौंदर्य

नखे सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी बाहेरून केल्या जाणाऱ्या उपायांऐवजी पौष्टिक आहार घेणं सर्वात महत्त्वाचं आहे, ज्यामध्ये प्रोटीन, लोह, जस्त आणि बायोटिन सारखे पोषक घटक (Healthy Diet For Nails) असायला हवेत. त्याविषयी अधिक जाणून घेऊया.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 15 जून : सुंदर नखे महिलांच्या हातांचे सौंदर्य आणखी वाढवतात. अशा अनेक स्त्रिया असतात ज्यांना मोठी नखे ठेवण्याची आवड असते, परंतु त्यांची नखे पुन्हा पुन्हा तुटतात. नखांची चांगली वाढ होण्यासाठी आणि नखं आकर्षक दिसण्यासाठी आहारही महत्त्वाचा असतो. अनेकांना माहीत नाही की, नखे सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी पौष्टिक आहार घेणं सर्वात महत्त्वाचं आहे, ज्यामध्ये प्रोटीन, लोह, जस्त आणि बायोटिन सारखे पोषक घटक (Healthy Diet For Nails) असायला हवेत. हेल्थ लाइन च्या माहितीनुसार, बायोटिन हे बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्व आहे, ज्याला व्हिटॅमिन बी7, कोएन्झाइम आर आणि व्हिटॅमिन एच असेही म्हणतात. हे सर्व पेशी प्रथिनांच्या विकासासाठी प्रभावी ठरतात. अन्नाद्वारे, आपल्या शरीराला अमीनो ऍसिड मिळतात, जे चयापचय वाढवण्यास मदत करतात. केस आणि नखांच्या वाढीसाठी अमिनो अॅसिड देखील चांगले आहे. प्रथिने - प्रथिने युक्त आहार घेणे निरोगी आणि मजबूत नखांसाठी खूप फायदेशीर ठरते. वेगवेगळ्या डाळी आणि मशरूममध्ये भरपूर प्रथिने आढळतात. ओमेगा -3 फॅटी ऍसिडस् समृद्ध मासे देखील प्रथिने आणि सल्फरचा चांगला स्रोत आहेत. जर तुमची नखे बारीक असतील आणि वारंवार तुटत असतील तर तुम्ही या गोष्टींचा आहारात समावेश करू शकता. लोह - शरीरातील लोहाचे कार्य पेशींना पुरेसा ऑक्सिजन पुरवणं हे आहे. शरीराला योग्य रीतीने ऑक्सिजन मिळाल्यावर नखेही निरोगी आणि मजबूत होतात. जर तुमच्यामध्ये लोहाची कमतरता असेल तर तुमच्या नखांच्या आकारावर आणि स्वरूपावर परिणाम होऊ शकतो. यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात लोहयुक्त पदार्थांचा समावेश करावा लागेल. पालक, बीटरूट, टोमॅटो आणि काळे हरभरे यांचा आहारात समावेश करून तुम्ही शरीराची लोहाची गरज पूर्ण करू शकता. हे वाचा -  Googleने बॅन केले Login-IDचोरी करणारे Apps,लगेच डिलीट करुन बदलाFacebook Password व्हिटॅमिन सी - कोलेजनच्या विकासासाठी व्हिटॅमिन सी आवश्यक आहे. व्हिटॅमिन सी नखांना ताकद देते. यासाठी लिंबू, संत्री, किवी, स्ट्रॉबेरी आणि टोमॅटो यासारख्या लिंबूवर्गीय फळांचा आपल्या खाण्याच्या दिनक्रमात समावेश करावा. तसेच, हिरव्या पालेभाज्या, पेपरिकामध्ये संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन सी असते, त्यामुळे त्याचा आहारात समावेश करावा. पुरुषांना दररोज 90 मिलीग्राम आणि महिलांना 75 मिलीग्राम व्हिटॅमिन सीची आवश्यकता असते. हे वाचा -   तुम्हालाही सारखा थकवा जाणवतो? हे पदार्थ शाकाहारींना एनर्जी वाढवण्यास करतील मदत जस्त - पेशींच्या वाढीसाठी आणि विभाजनासाठी शरीराला झिंकची गरज असते. पुरुषांना दररोज 11 मिलीग्राम जस्त आणि महिलांना 8 मिलीग्राम आवश्यक असते. यासाठी झिंक युक्त अन्नाचे सेवन करावे. हे मासे, अंडी, सोया, चणे, काळे बीन्स, बदाम, काजू आणि ड्रायफ्रुट्समध्ये मुबलक प्रमाणात आढळते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात