मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

शेजारच्या राज्यात Black Fungus चा कहर, एकाच दिवशी 1250 जणांना लागण

शेजारच्या राज्यात Black Fungus चा कहर, एकाच दिवशी 1250 जणांना लागण

कोरोना व्हायरसच्या (coronavirus) दुसऱ्या लाटेमधून देश सावरलेला नाही. त्याचवेळी आता म्युकरमायकोसिस (Mucormycosis ) म्हणजेच ब्लॅक फंगस हे नवं संकट उभं ठाकलं आहे. ब्लॅक फंगस (Black Fungus)च्या रुग्णांचा आकडा आता दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

पुढे वाचा ...
    बंगळुरु, 31 मे: कोरोना व्हायरसच्या (coronavirus) दुसऱ्या लाटेमधून देश अद्याप सावरलेला नाही. देशातील बहुतेक भाग संपूर्ण मे महिन्यात लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध होते. जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातही ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. त्याचवेळी आता म्युकरमायकोसिस (Mucormycosis) म्हणजेच ब्लॅक फंगस हे नवं संकट उभं ठाकलं आहे. ब्लॅक फंगसच्या (Black Fungus) रुग्णांचा आकडा आता दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यात एकाच दिवशी या रुग्णांची विक्रमी संख्या नोंदवली गेली आहे. महाराष्ट्राच्या शेजारच्या कर्नाटक (Karnataka) राज्यात रविवारी एकाच दिवसात 1250 नवे रुग्ण आढळले आहेत. यापैकी 1,193 जणांवर अजूनही उपचार होत आहेत. 18 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 39 जणांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या पत्रकामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. बंगळुरु शहरात (Bengluru) सर्वात जास्त 508 रुग्ण आढळले आहेत. धारवाडमध्ये 119 तर कलबुर्गी जिल्ह्यात 102 जणांना ब्लॅक फंगसची लागण झाली आहे. कर्नाटकात या रुग्णांची संख्या 400 पेक्षा जास्त नाही, असा दावा आरोग्यमंत्री डी. के. सुधाकर यांनी आठवडाभरापूर्वीच केला होता. त्यानंतर झपाट्याने राज्यात रुग्णांची संख्या वाढली आहे. फक्त 45+ लोकांनाच मोफत कोरोना लस का?; लसीकरणावरून सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला झापलं कोरोनामध्ये दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक राज्य आता कोरोना रुग्णांच्या संख्येत दुसऱ्या क्रमांकावर पोहचले आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात 20, 378 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 381 जणांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकात आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या 25, 87,827 वर पोहचली आहे. राज्यात कोरोनाचे एकूण 3,42,031 एक्टिव्ह केस आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Coronavirus, Karnataka

    पुढील बातम्या