• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • कोरोना काळात आधी फिरा मग भरा पैसे; कशी वाटली स्किम? फक्त लक्षात ठेवा ‘हे’ नियम

कोरोना काळात आधी फिरा मग भरा पैसे; कशी वाटली स्किम? फक्त लक्षात ठेवा ‘हे’ नियम

लोकांना आकर्षित करण्यासाठी 'हॉलिडे फर्स्ट,पे व्हेन यू रिटर्न' ही योजना सुरू केली आहे.

लोकांना आकर्षित करण्यासाठी 'हॉलिडे फर्स्ट,पे व्हेन यू रिटर्न' ही योजना सुरू केली आहे.

कंपनीकडून कर्ज घेऊन फिरायला जा.हप्त्यांमध्ये कर्ज (Loan) फेडा वेळेआधी परत फेड केली तर,व्याजही लागणार नाही (No Interest).

  • Share this:
    नवी दिल्ली,23 जुलै : कोरोनाममुळे (Corona) गेल्या काही महिन्यांपासून,आपण घरात अडकून पडलो आहोत. अशा परिस्थितीत कुठे फिरायला जायचा विचार करत असाल पण, बजेटमुळे (Low Bugged) शक्य होत नसेल तर, काही पर्यटन कंपन्यांनी विशेष ऑफर सुरू केल्या आहेत. त्या तुमच्याही फायद्याच्या (Tourism company) ठरू शकतात. आर्थिक अडचणींचा (Financial Difficulties) विचार करून कोरोना काळात या कंपन्यांनी आधी फिरून या आणि मग पैसे भरा अशी ऑफर (Offer)सुरू केली आहे. थॉमस कुक इंडिया आणि एसओटीसी ट्रॅव्हलने लोकांना आकर्षित करण्यासाठी 'हॉलिडे फर्स्ट,पे व्हेन यू रिटर्न' ही योजना सुरू केली आहे. यानुसार फिरून परत आल्यानंतर पैसे देऊ शकता. यासाठी थॉमस कुकने एनबीएफसी कंपनीशी करार केली आहे. जाणून घ्या काय आहे ऑफर? (इच्छा असूनही चवीमुळे पित नाही ग्रीन टी; या पद्धतीने होईल टेस्टी) फिरण्यासाठी मिळेल कर्ज यासाठी आधी थॉमस कुक किंवा एसओटीसी ट्रॅव्हलच एक पॅकेज निवडावं लागेल आणि त्यानंतर नॉन-बँकिंग फायनान्स कंपनीकडे (एनबीएफसी) अर्ज करावा लागेल. ग्राहकांची पात्रता पाहून त्यांना कर्ज देण्याचा निर्णय घेतला जाईल. एसओटीसी ट्रॅव्हलच्या मते,ग्राहकांना त्यांच्या कर्जाची परतफेड करण्याच्या क्षमतेनुसार 10 हजार ते 10 लाख रुपयांची कर्ज मंजूर कलं जाऊ शकतं. (या शहरात राहतात फक्त 138 लोक; मेयरने दिली जॉब आणि फुकट घराची ऑफर) परतल्यानंतर पुढच्या महिन्यापासून सुरू होईल हप्ता नोकरी करणाऱ्यांकडून पॅन,आधार,3 महिन्यांचं बँक स्टेटमेंट,पेमेन्ट स्लिप किंवा व्यवसायिकांकडून 2 वर्षांचं आयकर रिटर्न मागितलं जाईल. प्रवासातून परतल्यानंतर मासिक हप्ता किंवा ईएमआय पुढील महिन्याच्या पाचव्या दिवसापासून सुरू होणार. पण, त्या तारखेपूर्वी संपूर्ण रक्कम भरल्यास कोणतंही व्याज द्यावं लागणार नाही. इन्टॉलमेन्ट 3, 6, 9 किंवा 12 महिन्यांसाठी ठेवता येतं. दरमहा व्याज दर 1 टक्के असेल. 3 महिन्यांसाठी 3 टक्के आणि 6 महिन्यांसाठी 6 टक्के असणार. (बॉडी वॅक्सिंगसाठी वापरा ही ट्रिक; अनावश्यक केस होतील गायब) कर्ज घेणं योग्य आहे का? वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा प्रवासासाठी कर्ज घेणं कधीच चांगलं नसतं. आर्थिक तज्ज्ञांच्या मते शिक्षण आणि गृह कर्ज घेणं चांगलं कर्ज मानलं जातं. पण, फिरण्यासाठी कर्ज घ्यावं लागत असेल तर, याचा अर्थ आपली आर्थिक स्थिती अजिबात चांगली नाही असं समजावं. फाइनान्शियल प्लॅनर संकेत यादव सांगतात फिरण्याचा प्लॅन असेल तर, एक वर्षासाठी रेकरिंग डिपॉजिट किंवा सिप (सिस्टमैटिक इन्वेस्टमेंट प्लान) सुरु करा. वैयक्तिक कर्जापेक्षा ही योजना स्वस्त असेल तरच जोखीम घ्या. बँक बाजारचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदिल शेट्टी सांगतात की, कर्जाचा कालावधी,व्याज दर यांची संपूर्ण माहिती घ्या. (वडिलांच्या स्वप्नासाठी केले परिश्रम; 22व्या वर्षीच IPS अधिकारी झाल्या पूजा आवान) मग,त्याची तुलना वैयक्तिक कर्ज किंवा क्रेडिट कार्डशी करा. स्वस्त असेल तरच रिस्क घ्या. वैयक्तिक कर्जावरील व्याज दर 8.95 टक्के पासून 20 टक्क्यांपर्यंत असू शकतं. तर, क्रेडिट कार्डचं मंथली इन्टॉलमेन्ट वैयक्तिक कर्जापेक्षा लवकर परतफेड करता येतं. परंतु त्यावरचं व्याज दर जास्त आहे.
    Published by:News18 Desk
    First published: