मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

शहरात राहतात फक्त 138 लोक; मेयरने दिली जॉब आणि फुकट घराची ऑफर

शहरात राहतात फक्त 138 लोक; मेयरने दिली जॉब आणि फुकट घराची ऑफर

या शहरात कायमस्वरूपी वास्तव्यासाठी येण्याचं जाहीर आमंत्रण देण्यात आलं असून, त्यासाठी लोकांना नोकरीसह राहण्याची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्याची तयारी प्रशासनानं दाखवली आहे.

या शहरात कायमस्वरूपी वास्तव्यासाठी येण्याचं जाहीर आमंत्रण देण्यात आलं असून, त्यासाठी लोकांना नोकरीसह राहण्याची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्याची तयारी प्रशासनानं दाखवली आहे.

या शहरात कायमस्वरूपी वास्तव्यासाठी येण्याचं जाहीर आमंत्रण देण्यात आलं असून, त्यासाठी लोकांना नोकरीसह राहण्याची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्याची तयारी प्रशासनानं दाखवली आहे.

माद्रिद (स्पेन), 22 जुलै: स्पेन (Spain) या युरोपातील एका सुंदर देशातील एक टुमदार शहर लोकसंख्येअभावी ओस पडलं असून, ते पुन्हा पूर्वीसारखं करण्याकरता स्थानिक प्रशासनानं एक अनोखी योजना आखली आहे. या शहरात कायमस्वरूपी वास्तव्यासाठी येण्याचं जाहीर आमंत्रण देण्यात आलं असून, त्यासाठी लोकांना नोकरीसह राहण्याची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्याची तयारी प्रशासनानं दाखवली आहे. स्थानिक प्रशासनानं चक्क याची जाहिरात देऊन लोकांकडून अर्ज मागवले आहेत. झी न्यूज इंडिया डॉट कॉमनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

अशी अनोखी ऑफर देणाऱ्या शहराचं नाव पलाडेर डी अरागॉन (Paladar de Aragon) असं असून, ते स्पेनची राजधानी माद्रिदच्या(Madrid) पूर्वेस असलेल्या ग्रिगोस  प्रांतात आहे. या अनोख्या ऑफरला स्पेनमधूनच नव्हे तर संपूर्ण लॅटिन अमेरिका, क्रोएशिया आणि रोमानियामधूनही प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत 3 हजार लोकांनी अर्ज केले आहेत. या प्रतिसादामुळे प्रशासनालाही आनंद झाला असून मोठ्या उत्साहानं इथं येणाऱ्या लोकांची सोय करण्यासाठी तयारी केली जात आहे. येणाऱ्या लोकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी शहरातील वसतिगृहं(Hostels) दुरुस्त करण्याचे आदेशही देण्यात आले असून, अन्य सेवा सुविधाही सज्ज केल्या जात आहेत.

सध्या या शहरात केवळ 138 लोक राहतात, तर इथल्या शाळेत सध्या फक्त 9 विद्यार्थी आहेत. एकेकाळी इतर शहरांप्रमाणेच हे शहर गजबजलेलं होतं. मात्र हळूहळू इथले लोक नोकरी, धंद्याच्या निमित्तानं आसपासच्या मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरीत झाले आणि एकेकाळी लोकांनी बहरलेलं हे शहर ओस पडलं. इथल्या मोठमोठ्या घरांना कुलुपं लागली. शहरातील घटत्या लोकसंख्येमुळं काळजीत पडलेल्या प्रशासनानं पुन्हा हे शहर पहिल्यासारखं करण्याचा निर्णय घेतला आणि त्यादृष्टीनं प्रयत्न सुरू केले आहेत.

हज यात्रेत घडला इतिहास; मक्केत पहिल्यांदाच महिला रक्षक तैनात

लोकांना इथं येण्याकरता प्रोत्साहन देण्यासाठी योजना तयार केल्या जात असून, त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून त्यांनी बाहेरच्या देशातील लोकांनाही इथं स्थायिक होण्याचं आमंत्रण दिलं तेही नोकरी आणि जागेसह(Job and Houses).

या आहेत काही अटी

स्थानिक प्रशासनानं (Local Government) या शहरात स्थायिक होण्यासाठी नोकरी आणि मोफत निवासस्थानाची सुविधा देऊ केली असली तरी काही अटीही घालण्यात आल्या आहेत. पलाडेर डी अरागॉनमध्ये नोकरीबरोबरच निवासाची मोफत व्यवस्था केली जाणार असली तरी ही विनामूल्य निवास व्यवस्था कायम स्वरूपी नसून ती फक्त सुरुवातीच्या तीन महिन्यांसाठी आहे. यानंतर लोकांना अगदी कमी भाड्यात घर दिले जाईल. आणखी एक महत्त्वाची अट आहे, ती म्हणजे ज्यांना मुले आहेत आणि ते स्थानिक शाळेत आपल्या मुलांना शिकविण्यासाठी तयार आहेत, त्या लोकांनाच या ऑफरचा फायदा मिळणार आहे.

5 पैशांचं नाणं देऊन फ्री बिर्याणी खाण्याची दिली ऑफर,पण मालकाचा अंदाज चुकला आणि...

ही अशी अट घालण्यामागचं कारण उपमहापौर(Deputy Mayor) अर्नेस्टो ऑगस्टी (Ernesto Agusti) यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले की, सध्या इथल्या शाळेत फक्त 9 मुलं (Students) शिक्षण घेत आहेत. भविष्यात ही शाळा बंद होऊ नये, यासाठी इथं रहायला येणाऱ्या लोकांनी आपल्या मुलांना इथल्या शाळेत घालण्याची अट असल्याचं अर्नेस्टो यांनी सांगितलं. प्रशासनानं अशी ऑफर दिल्यानंतर स्पेनमधील इतर शहरांमधील लोकांकडून अर्ज येतील, अशी अपेक्षा होती, मात्र स्पेनसह रोमानिया, लॅटिन अमेरिका इथूनही लोकांचे अर्ज आल्याचं अर्नेस्टो यांनी सांगितलं.

या वर्षाच्या सुरुवातीला इटलीच्या(Italy) सिसिली टाऊन प्रशासनानं (Sicilian Town Government) अशीच एक योजना आणली होती. या योजनेंतर्गत अवघ्या एका युरोमध्ये 900 रिकामी घरं तिथं येणाऱ्या लोकांना राहण्यासाठी देण्यात आली.

First published:

Tags: Population, Spain