जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / प्रेमाच्या बाबतीत प्राचीन भारत खूपच पुढे; जोडीदार निवडीपासून लिव्हिनपर्यंत अनेक गोष्टींचे स्वातंत्र्य

प्रेमाच्या बाबतीत प्राचीन भारत खूपच पुढे; जोडीदार निवडीपासून लिव्हिनपर्यंत अनेक गोष्टींचे स्वातंत्र्य

प्रेमाच्या बाबतीत प्राचीन भारत खूपच पुढे

प्रेमाच्या बाबतीत प्राचीन भारत खूपच पुढे

प्राचीन भारतातील परंपरा प्रेम आणि विवाहाच्या बाबतीत खूप पुढे आहेत. कालिदासच्या एका नाटकात प्रेयसीने प्रियकराचे मन जिंकण्यासाठी काय काय करावे असा स्पष्ट उल्लेख आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 8 फेब्रुवारी : सध्या जगभर प्रेमाचा आढवडा सुरू झाला आहे. हा आठवडा प्रेमी युगुलांसाठी खास मानला जातो. वास्तविक, व्हॅलेंटाईन संस्कृतीला आपल्याकडे काही प्रमाणात विरोध देखील होतो. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रेम व्यक्त करणे हा आपल्या संस्कृतीचा भाग नसून भारतीय संस्कृती भ्रष्ट करत असल्याचा आरोप अनेक संघटनांनी केला आहे. मात्र, भारतीय संस्कृतीत प्रेम व्यक्त करण्यालाची परंपरा असल्याचे प्राचीन ग्रंथ आणि साहित्यात वाचायला मिळेल. प्राचीन भारतातील परंपरा प्रेम आणि विवाहाच्या बाबतीत पुरोगामी आहे. कालिदासच्या एका नाटकात वसंत ऋतूत एक प्रेयसी तिच्या प्रियकराला लाल फुलाच्या माध्यमातून प्रेमचा प्रस्ताव कसा पाठवते याचा स्पष्ट उल्लेख आहे. अथर्ववेद तर यापुढे आहे. त्यात लिहिलंय की प्राचीन काळी पालकांनी आनंदाने मुलीला स्वतःचे प्रेम निवडण्याची परवानगी दिली होती. युरोपमध्ये 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे असतो. नेमका याच काळात आपल्या देशात वसंत ऋतु येतो. ज्याला मधुमास महिना किंवा कामोत्तेजक ऋतू असेही म्हणतात. या ऋतूत आपलं प्रेम ऐन भरात येते. रोमान्सचा गुलाल सगळीकडे उधळत असतो. वसंत ऋतु थेट प्रेमाशी संबंधित आहे. …लाल फुलांच्या माध्यमातून प्रेम प्रस्ताव कालिदास इ.स.पूर्व 150 ते 600 वर्षांदरम्यान होऊन गेले असे मानले जाते. कालिदास यांनी दुसरे सुंग शासक अग्निमित्र याला नायक बनवून मालविकाग्निमित्रम् हे नाटक लिहिले. अग्निमित्राने इ.स.पूर्व 170 मध्ये राज्य केले. या नाटकात त्यांनी वसंत ऋतूच्या आगमनावेळी राणी इरावती राजा अग्निमित्राला लाल फुलाद्वारे प्रेमाचा प्रस्ताव कसा पाठवते याचा उल्लेख केला आहे. वाचा - प्रेमी युगलांना मिळतं कायद्याचं पूर्ण पाठबळ; जाणून घ्या सविस्तर माहिती वसंत ऋतु हा प्रणयाचा कालिदासाच्या काळात वसंत ऋतूच्या आगमनावेळी प्रणयाच्या भावना हवेत असतात. प्रेम प्रसंगात बुडालेल्या सर्व नाटकांच्या सादरीकरणासाठी हाच योग्य काळ होता. यावेळी महिला आपल्या पतीसोबत झुल्यावर डोलत असत. कदाचित त्याच कारणास्तव याला मदनोत्सव असेही म्हणतात. या ऋतूत कामदेव आणि रतीची पूजा करण्याची प्रथा आहे. लिव्हिनसारखी परंपराही होती हिंदू ग्रंथानुसार, प्राचीन भारतातील मुलींना स्वतःचा पती निवडण्याचा अधिकार होता. ते आपापल्या अटींवर एकमेकांना भेटायचे. ते संमतीने एकत्र राहायचे. म्हणजे, जर एखादे तरुण जोडपे एकमेकांना आवडले असेल तर ते एकमेकांसोबत राहत होते. त्यांना त्यांच्या लग्नासाठी त्यांच्या पालकांच्या संमतीची गरज नव्हती. वैदिक पुस्तकांनुसार, ऋग्वेदिक काळात ही विवाहाची सर्वात जुनी आणि सर्वात सामान्य पद्धत होती. लिव्ह इन रिलेशनशिपसारखी परंपराही होती.

News18लोकमत
News18लोकमत

तेव्हा गंधर्व विवाह श्रेष्ठ होता अथर्ववेदातील एक उतारा सांगतो, पालक सहसा मुलीला स्वतःचे प्रेम निवडू देत होते. ते थेट तिला प्रेमप्रकरणासाठी प्रोत्साहन देत होते. मुलगी सज्ञान झाली असे आईला वाटल्यास ती मुलीला मुलगा निवडण्याचे स्वतंत्र देत होती. यात काही असामान्य नव्हते. जर कोणी धार्मिक परंपरेशिवाय गंधर्व विवाह करत असेल तर तो सर्वोत्तम विवाह मानला जात असे. आजही अनेक आदिवासी समाजात हीच प्रथा जर मुलगा आणि मुलगी एकमेकांना पसंत करत असतील आणि ते काही काळ एकत्र राहिले. तर समाज त्यांना लग्नासाठी परवानगी देण्याचा विचार करतो. आजही देशात छत्तीसगडपासून ईशान्येपर्यंत आणि अनेक आदिवासी समाजांमध्ये अशा प्रथा सुरू आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात