जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / प्रेमी युगलांना मिळतं कायद्याचं पूर्ण पाठबळ; जाणून घ्या सविस्तर माहिती

प्रेमी युगलांना मिळतं कायद्याचं पूर्ण पाठबळ; जाणून घ्या सविस्तर माहिती

 प्रेमी युगलांना मिळतं कायद्याचं पूर्ण पाठबळ

प्रेमी युगलांना मिळतं कायद्याचं पूर्ण पाठबळ

भारतीय समाजातल्या प्रत्येक प्रेमी जोडप्याला लग्न करणं शक्य होतं नसलं तरी देशाचा कायदा त्यांना कोणाशीही लग्न करण्याची मुभा देतो.

  • -MIN READ Local18 Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 07 फेब्रुवारी :  फेब्रुवारी महिन्याला ‘मंथ ऑफ लव्ह’ म्हणतात. या महिन्यात व्हॅलेंटाइन डे (14 फेब्रुवारी) असतो. आजपासून (7 फेब्रुवारी) व्हॅलेंटाइन वीक सुरू झाला असून सगळीकडं प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत. प्रेमी जोडपी वर्षभर या आठवड्याची वाट पाहत असतात. भारतीय समाजातल्या प्रत्येक प्रेमी जोडप्याला लग्न करणं शक्य होतं नसलं तरी देशाचा कायदा त्यांना कोणाशीही लग्न करण्याची मुभा देतो. इतकंच नाही, तर अनेक प्रकरणांमध्ये प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्यांना कायदेशीर संरक्षणही दिलं जातं. फक्त त्यासाठी दोघांनीही वयाची कायदेशीर अट पूर्ण केलेली असावी, एवढीच अट असते.

    जाहिरात

    भारतीय कायद्यात वेगवेगळ्या धर्मांसाठी वेगवेगळे विवाह कायदे तयार करण्यात आलेले आहेत. या कायद्यांतर्गत प्रौढ व्यक्ती त्यांच्या इच्छेनुसार विवाह करू शकतात. एवढंच नाही, तर कुटुंब आणि समाजाकडून मुलगा-मुलगीच्या जीवाला धोका असल्यास त्याबाबत पोलीस व जिल्हा प्रशासनाची मदतही घेता येते. नागरी विवाह कायदा, विशेष विवाह कायदा, हिंदू विवाह कायदा इत्यादींच्या मदतीनं प्रेमी जोडपी लग्न करू शकतात.

    हेही वाचा - Valentine Day 2023 : गर्लफ्रेंडसोबत लॉजवर पकडल्यास काय कराल? हे अधिकार माहीत आहे का?

    विवाह कायद्याबद्दल काय म्हणतात तज्ज्ञ विवाह कायद्याबाबत वकील अशोक जैन सांगतात, की न्यायालयानं प्रेमी युगलांना एकत्र आणण्यासाठी अनेक प्रकारचे कायदे तयार केलेले आहेत. प्रत्येक जाती-समाजातल्या प्रेमी युगलांसाठी हिंदू विवाह कायदा, मुस्लिम विवाह कायदा, पर्शियन विवाह कायदा असे स्वतंत्र विवाह कायदे तयार करण्यात आले आहेत. या माध्यमातून प्रेमी युगलांना विवाह बंधनात अडकता येतं. यासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलगी आणि मुलाचं वय अनुक्रमे 18 आणि 21 वर्षं पूर्ण असावं. म्हणजेच, कायदेशीर विवाह करायचा असेल तर प्रेमी युगलानं वयाची अट पूर्ण करणं गरजेचं आहे.

    जाहिरात

    सध्या सुरू असलेल्या लिव्ह-इन रिलेशनशिपबाबत जैन सांगतात की, प्रौढ मुला-मुलींना स्वतःचं चांगले-वाईट समजत असेल तर ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू शकतात. लग्नासाठी मुलगा-मुलगीनं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्येच राहिलं पाहिजे, असंही नाही. ते त्यांच्या अटींच्या आधारे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू शकतात आणि त्यांच्या इच्छेनुसार ते नातं संपुष्टातही आणू शकतात.

    व्हॅलेंटाइन्स डे दर वर्षी 14 फेब्रुवारीला साजरा केला जातो. या दिवसाच्या अगोदर अनेक खास दिवस साजरे केले जातात. त्याला व्हॅलेंटाइन वीक असं नाव देण्यात आलं आहे. व्हॅलेंटाइन वीकमध्ये सात फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत रोज डे, टेडी डे अशा प्रकारचे वेगवेगळे दिवस साजरे केले जातात.

    जाहिरात
    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात