नवी दिल्ली, 21 मार्च : सुंदर केसांसाठी (Beautiful Hair) आपण काय काय करत नाही? महागडे शाम्पू वापरतो, महागडे हेयर केअर टुल्स वापरतो. वेगवेगळ्या टिप्स आणि होम रेमेडीज (Home Remedies), हेअर केअर रुटीन फॉलो करतो. मात्र तरी देखील केस चांगले होत नाहीत. मग आपण पार्लर ट्रीटमेंटसाठी (Treatment) हजार रुपये खर्च करतो. यापेक्षा आपण कोरफडीपासून बनवलेला होममेड शॅम्पू (Homemade Shampoo) वापरून केसांना नैसर्गिकरीत्या सुंदर बनवू शकतो.
कोरफडीत अनेक औषधी घटक असतात. त्याचे अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म कोंडा आणि डोक्याच्या त्वचेचे संक्रमण कमी करण्यास मदत करतात. अॅन्टीऑक्सिडंट घटकांनी समृद्ध कोरफड केस लांब, दाट आणि मुलायम बनविण्यास मदत करते. जाणून घेऊया, घरच्या घरी एलोवेरा शॅम्पू कसा बनवायचा आणि त्याचे फायदे.
घरच्या घरी एलोवेरा शॅम्पू कसा बनवायचा
कोरफडीचा शॅम्पू बनवण्यासाठी कोरफडीच्या ताज्या पानांपासून जेल काढा. आता एका पातेल्यात पाणी गरम करा. या पाण्यात साबण किंवा थोडा शॅम्पू मिसळा आणि ते वितळेपर्यंत उकळवा. आता एलोवेरा जेल सोबत व्हिटॅमिन ई आणि जोजोबा तेल घालून चांगले मिक्स करा. हे मिश्रण एका बाटलीत भरून ठेवा आणि केसांवर वापरण्यापूर्वी बाटली चांगली हलवायला विसरू नका. आता आपण एलोवेरा शॅम्पू वापरण्याचे काही फायदे जाणून घेऊया.
केसांच्या वाढीसाठी उपयुक्त
एलोवेरा शाम्पूमध्ये व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते. कोरफडीचा शॅम्पू नियमित वापरल्याने केसांची लांबी वेगाने वाढू लागते.
हे वाचा - दीर्घायुष्य आनंदी, निरोगी राहणं आपल्या हातात आहे, इतकीशी गोष्ट अनेकजण विसरतात
डोक्यात खाज सुटणे
कधीकधी डोक्यातील कोंडा आणि डोक्यातील त्वचेच्या संसर्गामुळे केसांच्या मुळात खाज सुटू लागते. कोरफड शॅम्पूमध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट घटक केसांच्या सर्व समस्या कमी करून खाज सुटण्याचा त्रास कमी करतात.
मऊ केस
एलोवेरा शॅम्पू केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करतो. तसेच, यामध्ये असलेले व्हिटॅमिन ई केसांना सॉफ्ट आणि बाउंसी बनवण्यासाठी उपयुक्त आहे.
हे वाचा - हृदय निरोगी ठेवण्यासाठी उन्हाळ्यात ही फळं खायला हवीत; आहेत अनेक फायदे
केस गळणं कमी होईल
अनेक वेळा केमिकलयुक्त केसांच्या उत्पादनांमुळे केस झपाट्याने गळू लागतात. कोरफडीचा शॅम्पू केसांना मुळापासून मजबूत बनवून गळती कमी करण्यास फायदेशीर आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Lifestyle, Woman hair