उन्हाळ्यात शरीरात डिहाइड्रेशन होऊ लागतं. त्यामुळे शरीरात कमजोरी, अशक्तपणा येऊ शकतो. हे अगोदरच टाळण्यासाठी लिंबूपाणी हे एक उत्तम पेय आहे. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते, तसेच उन्हाळा आणि उष्माघातापासून आपला बचाव होतो.
नारळाच्या पाण्यात शरीराला आवश्यक असलेले सर्व घटक असतात. उन्हाळ्यात नारळ पाणी नियमित प्यायल्यानं आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता तर दूर होतेच पण त्वचेलाही फायदा होतो. नारळपाणी पिऊनही आणप सन स्ट्रोक टाळू शकतो.
उन्हाळ्यात आपण सातू (बार्ली)पासून बनवलेले एनर्जी ड्रिंक पिऊन तुमचे शरीर हायड्रेट ठेवू शकता. यासाठी सातू पाण्यात उकळून गाळून घ्या. त्यात लिंबाचा रस आणि मध मिसळून प्या. यामुळे तुमच्या शरीराला भरपूर ऊर्जा मिळेल.
उन्हाळ्यात शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी सफरचंद, लिंबू आणि आलं यांचा रस काढून प्या. हे पेय आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे.
ग्रीन टी आणि चिया सीड्स मिक्स करून बनवलेले पेय आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. खूप थकवा जाणवत असताना या पेयाचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. चिया बियांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)