Home /News /lifestyle /

चोरीला गेलेल्या सायकलमध्ये अडकला होता त्याचा जीव; पोलिसांनी 2 आठवड्यांतच काढली शोधून

चोरीला गेलेल्या सायकलमध्ये अडकला होता त्याचा जीव; पोलिसांनी 2 आठवड्यांतच काढली शोधून

ही सायकल (bicycle) म्हणजे त्या व्यक्तीचं जणू आयुष्यच होतं आणि ते आयुष्य पोलिसांनी त्याला परत मिळवून दिलं आहे.

    हैदराबाद, 02 नोव्हेंबर : काही वस्तू अशा असतात त्या आपल्या जीवापेक्षाही आपल्याला प्रिय असतात. इतरांसाठी त्या वस्तू छोट्या असतील किंवा त्यांच्या नजरेत त्याची किंमत काहीच नसेल मात्र आपल्यासाठी त्या मौल्यवान असतात. अशी वस्तू हरवली किंवा चोरीला गेली की जीव कासावीस होतो आणि ती वस्तू आपल्याला कधीच सापडणार नाही असं वाटलं तर मग आपण पूर्णपणे खचतो. एखाद्या व्यक्तीला गमावल्याचं दुःख जितकं होतं तितकंच ती वस्तू गमावल्यावरही होतं. असंच काहीसं झालं ते हैदराबादमधील (hyderabad) एका व्यक्तीच्या बाबतीत. गेली 14 वर्षे त्याच्यासोबत असणारी त्यांची सायकल (bicycle) चोरीला गेली आणि ती पोलिसांच्या मदतीमुळे पुन्हा सापडली. हैदराबादमध्ये राहणारे 51 वर्षांचे शाईक अमेर. आपली पत्नी आणि दोन मुलांसह भाड्याच्या घरात ते राहतात. कोरोना महासाथीत त्यांनी आपली नोकरी गमावली. पुरामुळे रेशनही मिळणं अशक्य झालं. त्यात  14 वर्षांपूर्वी खरेदी केलेली आणि त्यांच्या या कठीण काळात त्यांना साथ देणारी त्यांची सायकल अचानक चोरीला गेली.  मजूर म्हणून काम करत असलेले अमेर 21 ऑक्टोबरला आपली सायकल लॉक करून जवळच चहा पिण्यासाठी गेले आणि त्याचवेळी चोरट्यांनी संधी साधली. त्यांची सायकल पळवली. पानशॉपवर काम करणाऱ्या अमेर यांनी कोरोना महासाथीत आपली नोकरी गमावली. त्यानंतर त्यांनी महिलांच्या पर्स विकायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी 14 वर्षांपूर्वी 1000 रुपयांना सायकल खरेदी केलेल्या त्यांच्या या सायकलनं साथ दिली. द न्यूज मिनिटशी बोलताना अमेर  म्हणाले, "मी माझ्या मित्राच्या बाईकवरून कामाला जायचो मात्र जेव्हा त्याला शक्य व्हायचं नाही तेव्हा मी 10 किमी किंवा त्यापेक्षा जास्त अंतर या सायकलनं गाठायचो" हे वाचा - नवरा टकला म्हणून पत्नीची पोलिसात तक्रार; कोर्टानंही टक्कल पडलेल्या पतीला फटकारलं मात्र त्यांचा हा व्यवसायही फार काळ चालला नाही. त्यावेळी ते मजूर म्हणून काम करू लागले. त्यात दुष्काळात तेरावा महिना, त्यांची सायकलही चोरीला गेली. अमेर म्हणाले, "कुटुंबाचा  गाडा हाकलणं माझ्यासाठी कठिण झालं होतं. मला दिवसाला 200 रुपये मिळायचे आणि कधी कधी तर काहीच नाही. आम्ही एका कठीण परिस्थितीतून जात होतो. त्याच वेळी चोरानं माझी सायकलही चोरली. त्यामुळे मी आणखीनच खचलो" अमेर यांनी कामाटीपुरा पोलीस ठाण्यात आपली सायकल चोरीला गेल्याची तक्रार दिली. पोलिसांनी त्यांना आपण चोराचा तपास करून लवकरच सायकल मिळून देऊ असं आश्वासन दिलं. मात्र अमेर यांनी आशाच सोडली होती. "शहरात अशा किती मोठमोठ्या चोऱ्या होत असतील. त्यामुळे माझी सायकल काही मला सापडणार नाही, मला ती परत मिळेल असं वाटलं नव्हतं. मी आशाच सोडली होती", असं अमेर म्हणाले. हे वाचा - पायांनाच बनवले आपले हात आणि घेतली गगनभरारी; अपंग महिला पायलटच्या जिद्दीला सलाम अमेर पायीच कामावर जाऊ लागले. असंच एक दिवस कामावरून घरी परत येताना अमेर यांना कामाटीपुरातील एका सायकल दुकानात नव्यानं रंगवलेली सायकल दिसली. त्यांनी ही आपलीच सायकल आहे हे ओळखलं. त्यांनी त्या सायकलबाबत दुकानाच्या मालकाकडे चौकशीही केली. मात्र त्याने काही जास्त माहिती दिली नाही. अमेरनं याबाबत पोलिसांना सांगितलं आणि पोलीस त्या दुकानात आले. ही सायकल चोरीचीच होती. आपण ती 500 रुपयांना खरेदी केल्याची कबुली दुकान मालकानं दिली. अखेर पोलिसांमुळे अमेरची सायकल त्याला परत मिळाली. हैदराबाद शहर पोलिसांनीदेखील आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर याची माहिती दिली आहे. "चोरीला गेलेली एक सायकल शोधून ती त्याच्या मालकाच्या स्वाधीन करण्यात आली आहे. ही घटना छोटी वाटेल, मात्र त्या व्यक्तीसाठी खूप काही आहे", असं हैदराबाद पोलिसांनी फेसबुकवर म्हटलं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Hyderabad, Police

    पुढील बातम्या