

पायलट होणं तसं खूपच अशक्य. त्यात शारीरिक व्यंग असेल तर मग पायलट होण्याचं स्वप्नं दूरच. मात्र ते प्रत्यक्षात करून दाखवलं आहे ते एका महिलेनं. जगातील हात नसलेली ती पहिली पायलट आहे. तिच्या नावाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य - न्यूज18 तेलुगु)


अमेरिकेत राहणारी जेसिका कॉक्स जगातील ही एकमेव पायलट आहे, जिला हात नाहीत. तिच्याकडे जगातील पहिलं असं लायसन्स आहे, जे आर्मलेस म्हणजे हात नसलेल्या पायलटला देण्यात आलं.(फोटो सौजन्य - न्यूज18 तेलुगु)


जेसिकाला जन्मापासूनच हात नाही. ते पाहून तिचं आईवडीलही हैराण झाले होते. आपल्या नकली हातांनी काम करायची. वयाच्या 14 व्या वर्षापासून जेसिकानं आपली कामं आपल्या पायानं करणं सुरू केलं. (फोटो सौजन्य - न्यूज18 तेलुगु)


जेसिका आपली बहुतेक कामं पायांनीच करते. मग खाणं असो किंवा बुटांच्या लेस बांधणं असो किंवा लिहिणं. विमानाप्रमाणे ती कारही पायानं चालवतं, स्कूबा डायव्हिंग आणि कीबोर्डवर टायपिंगही ती पायनंच करते. 2012 मध्ये जेसिकाचं पॅट्रिक चँबरलेनशी लग्न झालं. त्यावेळी तिच्या नवऱ्यानं तिच्या पायाच्या बोटांमध्येच अंगठी घातली होती. (फोटो सौजन्य - न्यूज18 तेलुगु)