Home /News /lifestyle /

नवरा टकला म्हणून पत्नीची पोलिसात तक्रार; कोर्टानंही टक्कल पडलेल्या पतीला फटकारलं

नवरा टकला म्हणून पत्नीची पोलिसात तक्रार; कोर्टानंही टक्कल पडलेल्या पतीला फटकारलं

टक्कल असल्यानं पत्नीनं तक्रार केल्यानंतर पती कोर्टात दाद मागायला गेला मात्र कोर्टानंही त्याची बाजू घेतली नाही असं का?

    मुंबई, 02 नोव्हेंबर : बहुतेक पुरुषांना टक्कल (Baldness) असतं. काही जणांना लग्नाच्या आधीपासूनच असतं, काही जणांना लग्नानंतर पडतं. मात्र नवरा टकला आहे, म्हणून एखाद्या पत्नीनं आपल्या पतीविरोधात तक्रार केल्याचं तुम्ही कधी ऐकलं नसेल. त्यातही महत्त्वाचं म्हणजे फक्त पत्नीच नाही तर पत्नीच्या तक्राराविरोधात कोर्टात दाद मागायला गेलेल्या या पतीला कोर्टानंही फटकारलं आहे. याचं कारणही तसंच आहे. मुंबईतील 29 वर्षांची व्यक्ती. काही दिवसांपूर्वीच लग्न झालं. संसाराचा गाडा रूळावर येण्याआधीच तो घसरला आणि याचं कारण म्हणजे त्याचं टक्कल. त्याच्या 27 वर्षांच्या पत्नीनं त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. का तर तो टकला आहे? कारण फक्त हेच नाही तर त्यानं लग्नाआधी आपल्या होणाऱ्या पत्नीपासून त्यानं हे लपवलं होतं. विग लावून त्यानं लग्न केलं. त्यामुळे कुणालाच याची माहिती नव्हती. लग्नानंतर आपला नवरा टकला आहे, हे नवविवाहितेला समजलं आणि तिला धक्काच बसला. तिनं सासरच्या मंडळींना याबाबत सांगतिलं, तेव्हा त्यांनीदेखील हे गांभीर्यानं घेतलं नाही. हे काही इतकं मोठं नाही असं ते तिला म्हणाले. त्यानंतर महिलेनं पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि पतीविरोधात तक्रार दिली. हे वाचा - प्रसूतीनंतरही पोट लागत होतं कडक; पुन्हा ऑपरेशन करताच डॉक्टरांना बसला धक्का जर लग्नाआधी आपला  होणारा नवरा टकला आहे हे समजलं असतं तर आपण हे लग्नच केलं नसतं असं ती म्हणाली आपल्या पतीनं आपला विश्वासघात केला आहे, मानहानी केली आहे. अशी तक्रार तिनं पोलिसात दिली. पत्नीनं तक्रार करता पतीनं कोर्टाचे दरवाजे ठोठावले. कोर्टात जामिनासाठी अर्ज केला, मात्र कोर्टानेदेखील त्याला फटकालं. स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन होण्याचे आदेश कोर्टानं त्याला दिले. हे वाचा - '14 व्या वर्षी झाले लैंगिक शोषण'; डिप्रेशनबाबत बोलताना आमिरच्या मुलीचा खुलासा अनेकांची लग्न होतं नाही. त्यामुळे कित्येक पुरुष यावर काही ना काही उपाय शोधतात. काहीजण औषध करतात, काही जण विग लावतात आणि असंच विग लावणं आणि आपल्याला टक्कल आहे, हे आपल्या होणाऱ्या पत्नीपासून लपवणं या व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Mumbai, Relationship

    पुढील बातम्या