आता माझी सटकली! रिकामं भांडं पाहून भडकला भुकेला कुत्रा; मालकासमोर गेला आणि... VIDEO VIRAL

आता माझी सटकली! रिकामं भांडं पाहून भडकला भुकेला कुत्रा; मालकासमोर गेला आणि... VIDEO VIRAL

समोर रिकामी भांडं पाहून भुकेल्या कुत्र्याला राग अनावर झाला (Dog Got Angry After Watching Empty Plate) आणि मग पुढे काय घडलं ते तुम्हीच पाहा.

  • Share this:

मुंबई, 05 एप्रिल : तुम्हाला खूप जोरात भूक लागली आहे आणि तुमच्यासमोर कुणी रिकामी भांडं आणून ठेवलं तर तुमची तळपायाची आग मस्तकात जाईल, तुम्ही रागाने लालभडक व्हाल आणि त्यानंतर पुढे काय कराल हे तुम्हालाही माहिती नसेल. अशा एका भुकेल्या कुत्र्याचा (Dog) व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल  (Viral Video) होतो आहे.

कुत्र्याला खूप भूक लागलेली आहे. पण त्याच्यासमोर एक रिकामं भांडं ठेवण्यात  (Dog Got Angry After Watching Empty Plate) आली. आपल्या भांड्यात खायला नाही हे पाहून कुत्र्यालाही राग अनावर झाला. तो प्रचंड भडकला त्यानंतर तो मालकासमोर गेला आणि त्याने काय केलं तुम्हीच पाहा.

व्हिडीओत पाहू शकता, कुत्रा आधी आपल्या भांड्यात पाहतो तर भांडं रिकामं आहे. त्यात खायला काहीच नाही. सुरुवातीला तो जोरजोरात भुंकायला लागतो. त्यानंतर मालकासमोर जातो आणि त्याच्यासमोर भुंकतो. मग आपलं रिकामं भांड तोंडात आतो आणि मालकासमोर आणून जोरात आपटतो. पुन्हा जोरजोरात भुंकत राहतो. जणू काही आपलं भांडं रिकाम का, त्यात अजून खायला का नाही दिलं. असाच जाब तो आपल्या मालकाला विचारतो आहे आणि आता या भांड्यात पहिलं खायला दे अशी धमकीही तो मालकाला देतो आहे.

हे वाचा - भरधाव ट्रेनसमोर डान्स करत होता, पुढे असं काही घडलं की...; VIDEO पाहून थक्क व्हाल

आयएफएस अधिकारी प्रवीण अंगुसामी (IFS Officer Praveen Angusamy) यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटवर शेअर केला आहे. भूक लागल्यानंतर अर्ध्या सेकंदानंतर तुमची प्रतिक्रिया असं मजेशीर कॅप्शन त्यांनी दिलं आहे. व्हिडीओ पाहून आपल्यालाही हसू आवरणार नाही. नेटिझन्सही त्यावर अशाच बऱ्याच प्रतिक्रिया देत आहेत.

Published by: Priya Lad
First published: April 5, 2021, 6:18 PM IST

ताज्या बातम्या