Home /News /lifestyle /

भरधाव ट्रेनसमोर डान्स करत होता आणि पुढे असं काही घडलं की...; VIDEO पाहूनच थक्क व्हाल

भरधाव ट्रेनसमोर डान्स करत होता आणि पुढे असं काही घडलं की...; VIDEO पाहूनच थक्क व्हाल

सोशल मीडियावरील (Social media) ट्रेनचा (Train video) हा व्हायरल व्हिडीओ (Viral video) पाहताना तुमच्या मनात एक येईल आणि प्रत्यक्षात मात्र काही तरी वेगळंच घडताना दिसेल.

    मुंबई, 04 एप्रिल : सोशल मीडियावर (Social media) बरेच व्हिडीओ व्हायरल (Viral video) होत असतात. त्यात काही चांगला धडा देणारे, काही आश्चर्यचकीत करणारे, काही विचित्र, काही मजेशीर तर काही धडकी भरवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो. जो सुरुवातीला धडकी भरवणारा (Shocking video) आहे पण त्यानंतर मात्र तो मजेशीरच (Funny video) वाटेल. सोशल मीडियावर एका ट्रेनचा व्हिडीओ (Train video) व्हायरल होतो आहे. या ट्रेनसमोर एक व्यक्ती चक्क डान्स करते (Man dancing in front of the train) आणि त्यानंतर पुढे काय घडतं, ते तुम्हीच पाहा. खरंतर ते पाहून तुम्ही थक्क व्हाल. कारण व्हिडीओ पाहताना तुमच्या मनात एक येईल आणि प्रत्यक्षात मात्र काही तरी वेगळंच घडताना दिसेल. व्हिडीओत पाहू शकता, एक व्यक्ती रेल्वे रूळांच्या जवळ आहे. रूळांवरून एक ट्रेन वेगात येते आहे हे तो पाहतो आणि चक्क रूळांवर जाऊन त्या ट्रेनसमोरच उभा राहतो. रूळांवर फक्त उभा राहत नाही तर तो नाचू लागतो. ट्रेन वेगाने त्याच्या जवळ येते. आता याचं काही खरं नाही. ट्रेन याला उडवणार की काय असंच आपल्याला वाटतं. पण अरे हे काय? आपण जो काही विचार करत होतो, त्याच्या उलटच घडतं. ट्रेन या व्यक्तीला स्पर्शही करत नाही. उलट ट्रेन जवळ येताच ती व्यक्तीच ट्रेनला आपल्या एका पायाने लाथ मारते आणि जितक्या वेगाने ती ट्रेन त्याच्या समोर आली तितक्याच वेगाने ती मागे जाते. हे वाचा - सॅल्युट! आगीत हॉस्पिटल पेटलं तरी डॉक्टर करत राहिले रुग्णाची सर्जरी; पाहा VIDEO उद्योजक हर्ष गोएंका  (Harsh Goenka) यांनी आपल्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी  कोरोना लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतरही लोक कोरोना पॉझिटिव्ह का होत आहेत, असं मजेशीर आणि सूचक कॅप्शनही दिलं आहे. लोक कोरोना लस घेतल्यानंतर बिनधास्त होत आहेत, बेजबाबदारपणे वागत आहेत, कोरोना संकट स्वत:हून ओढवून घेत आहेत. असंच काही त्यांना यातून सांगायचं आहे. हे वाचा - VIDEO: आजार राहू दे पण इलाज आवर! इंजेक्शन घेताना आजीबाईने दिली खतरनाक रिअ‍ॅक्शन सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. लोकांना हा व्हिडीओ खूप आवडतो. नेटिझन्सनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Shocking viral video, Train, Viral, Viral videos

    पुढील बातम्या