मुंबई, 28 मे : उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेण्यासाठी लोक अनेक गोष्टींची मदत घेतात. कित्येक उपाय करूनही या दिवसात त्वचेच्या समस्या कमी करून स्कीन ग्लो राखणे, सर्वात कठीण काम बनते. पण, तुम्हाला माहीत आहे का की, फेस पॅक आणि समुद्री मिठाने (Sea salt) बनवलेले टोनर यांसारख्या गोष्टींचा वापर करून आपण काही वेळात त्वचा चमकदार बनवू (Sea salt for skin care) शकतो.
उन्हाळ्यात त्वचेवर झटपट चमक आणण्यासाठी स्कीन केअरमध्ये समुद्री मीठाचा समावेश करणे खूप फायदेशीर ठरू शकते. त्वचेला हायड्रेट ठेवण्यासोबतच औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले समुद्री मीठ इतर अनेक समस्या कमी करण्यासाठी उपयोगी आहे. जाणून घेऊया स्कीन केअरमध्ये समुद्री मीठाचा वापर आणि त्याचे काही फायदे.
समुद्राच्या मिठाने फेस मास्क बनवा -
उन्हाळ्यात, त्वचेला ऑयली फ्री ठेवण्यासाठी आणि त्वचेची जळजळ, खाज घालवण्यासाठी आपण सी सॉल्ट फेस मास्क वापरू शकता. तो तयार करण्यासाठी, 2 चमचे समुद्री मीठात 4 चमचे मध मिसळा आणि त्वचेवर लावा. 10-15 मिनिटे कोरडे झाल्यानंतर वॉशक्लोथ कोमट पाण्यात भिजवा आणि 30 सेकंद त्वचेवर ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा.
आंघोळीच्या पाण्यात समुद्री मीठ मिसळा -
समुद्री मीठ त्वचेसाठी नैसर्गिक स्क्रबर म्हणूनही काम करते. यासाठी आंघोळ करताना 1 टब पाण्यात एक तृतीयांश कप समुद्री मीठ विरघळवून घ्या आणि या पाण्यात 15-30 मिनिटे बसा. यामुळे तुमच्या त्वचेच्या छिद्रांमध्ये साचलेली घाण सहज साफ होईल आणि तुमची त्वचा चमकू लागेल.
हे वाचा -
रात्री उशिरा जेवत असल्यानं तुमचं वजन वाढतंय का? तज्ज्ञांनी सांगितली आहार पद्धती
सी सॉल्ट टोनर वापरून पहा -
समुद्रातील मीठापासून बनवलेले ऑइल सोपिंग फेशियल टोनर उन्हाळ्यात त्वचा बॅक्टेरियामुक्त करून मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्याचे काम करते. ज्याच्या मदतीने तुम्ही त्वचेला मॉइश्चरायझ ठेवू शकता, तसेच चेहऱ्यावरील पिंपल्स आणि मुरुमांपासून मुक्त होऊ शकता. यासाठी कोमट पाण्यात 1 चमचा समुद्री मीठ मिसळा आणि त्वचेवर स्प्रे करा.
हे वाचा -
असे देश जिथे सेक्स वर्कर्स सरकारला देतात Tax, महिलांना मिळतात हे लाभ
समुद्रातील मिठाचे मिस्क -
उन्हाळ्यात आपल्या निस्तेज आणि निर्जीव त्वचेला जिवंतपणा आणण्यासाठी आपण समुद्री मिठापासून बनवलेल्या मिस्कचीही मदत घेऊ शकता. यासाठी 100 मिली पाण्यात 1 चमचा समुद्री मीठ मिसळा आणि स्प्रे बाटलीत भरा. त्वचा निस्तेज झाल्यावर चेहऱ्यावर स्प्रे करून तुम्ही ती सहज ग्लोइंग करू शकता.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.