जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / रात्री उशिरा जेवत असल्यानं तुमचं वजन वाढतंय का? तज्ज्ञांनी सांगितली अशी आहार पद्धती

रात्री उशिरा जेवत असल्यानं तुमचं वजन वाढतंय का? तज्ज्ञांनी सांगितली अशी आहार पद्धती

रात्री उशिरा जेवत असल्यानं तुमचं वजन वाढतंय का? तज्ज्ञांनी सांगितली अशी आहार पद्धती

रात्रीचे जेवण हे दिवसातील शेवटचे जेवण असल्याने ते आरोग्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. रात्रीच्या जेवणानंतर पुढील 6 ते 8 तास शरीर कोणताही आहार घेत नाही, त्यामुळे त्याचे नियोजन विचारपूर्वक करणे आवश्यक आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 26 मे : आपण आपल्या आजी-आजोबांपासून ते आरोग्यतज्ज्ञ आणि सेलिब्रिटींकडून रात्रीचे जेवण लवकर खावे, वेळेवर झोपावे, असा सल्ला ऐकला असेल. पण, काही लोक असे आहेत जे पहाटे 3 वाजताही समोसे खातात, तर काही लोक असेही आहेत ज्यांना सूर्यास्तानंतर काहीही खायला आवडत नाही. आपल्या जेवणाच्या वेळेचा शरीराच्या क्रियांवर काही परिणाम होतो की, नाही हा नेहमीच वादाचा मुद्दा राहिला आहे. काटेकोर आहार पाळला जात नसला तरीही दिवसभरासाठी आपल्या जेवणाचे नियोजन करा आणि त्यामध्ये आवश्यक अंतर ठेवा. म्हणजे नाश्ता कधी करावा, दुपारचे जेवण कधी करावे आणि रात्रीच्या जेवणाची वेळ काय असावी. रात्रीचे जेवण हे दिवसातील शेवटचे जेवण असल्याने ते आरोग्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. रात्रीच्या जेवणानंतर पुढील 6 ते 8 तास शरीर कोणताही आहार घेत नाही, त्यामुळे त्याचे नियोजन विचारपूर्वक करणे आवश्यक आहे. रात्रीचे जेवण आणि वजन वाढणे - बरेच लोक असा युक्तिवाद करतात की, रात्री खूप उशिरा जेवल्याने किंवा उशिरा खाल्ल्यामुळे वजन वाढते किंवा इतर आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवतात. मात्र, काही तज्ज्ञ सल्ला देतात की, ही गोष्ट थोडीशी दिशाभूल करणारी असू शकते. खरं तर, आरोग्याच्या समस्यांचा आपल्या जेवणाच्या वेळेपेक्षा अन्नाच्या स्वरूपाशी (तुम्ही काय खात आहात) अधिक संबंध असू शकतो. बऱ्याच अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जे प्रौढ रात्री 8 वाजता किंवा नंतर खातात ते जास्त कॅलरी वापरतात, ज्यामुळे वजन वाढते. कारण जे रात्रीचे जेवण रात्री उशिरा खातात, त्यांनी दिवसभरातील कॅलरी वापरण्याची त्यांची कमाल मर्यादा ओलांडलेली असते. हे वाचा -  उन्हाळ्यात दातांच्या चांगल्या आरोग्यासाठी या 5 गोष्टी आहेत महत्त्वाच्या काय खातो ते देखील महत्त्वाचे - उशिरा जेवायचे झाल्यास जंक फूड किंवा कम्फर्ट फूड खाण्याची शक्यता जास्त असते. काही स्नॅक्स जे बहुतेक लोक झोपण्यापूर्वी खातात ते तळलेले बटाटा चिप्स, चॉकलेट आणि आइस्क्रीम आहेत. हे उच्च उष्मांक असलेले पदार्थ अचानक वजन वाढण्यास थेट हातभार लावतात, जे रात्रीचे जेवण उशिरा खाण्यासाठी जबाबदार असते. जेव्हा तुम्हाला भूक लागते तेव्हा रात्रीच्या जेवणात हेल्दी आणि हलके अन्न घेण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून तुम्ही अतिरिक्त कॅलरीज घेणार नाहीत. हे वाचा -  तरुण वयातील हा त्रास उतारवयात अनेक अडचणी आणू शकतो; आत्तापासूनच घ्या काळजी थोडक्यात, जोपर्यंत तुम्ही तुमच्या दैनंदिन उष्मांकाच्या गरजा पूर्ण करता तोपर्यंत रात्रीचे जेवण उशिरा खाण्यास हरकत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात