Home /News /lifestyle /

Asthma : दम्याचा अटॅक टाळण्यासाठी रोजच्या आयुष्यात स्वत:ची अशी घ्या काळजी

Asthma : दम्याचा अटॅक टाळण्यासाठी रोजच्या आयुष्यात स्वत:ची अशी घ्या काळजी

जागतिक स्तरावर अस्थमा (Asthma Problems) ही एक मोठी समस्या बनली आहे. अस्थमामुळे दरवर्षी लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागतो. परंतु आपण दैनंदिन आयुष्यात काही काळजी (Asthma Tips) घेतल्यास ही समस्या दूर ठेवण्यास मदत होऊ शकते.

  मुंबई, 17 जून : जागतिक स्तरावर वाढणाऱ्या गंभीर श्वसनाच्या समस्यांपैकी दमा (Dama) ही एक मोठी समस्या आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार (World Health Organization) 2019 मध्ये सुमारे 262 दशलक्ष लोकांना दम्याची (Asthma Infection) लागण झाली होती आणि त्यातील 4.55 लाख लोकांचा मृत्यू झाला होता. भारतात देखील वेगवेगळ्या कारणांमुळे (Asthma Reasons) दम्याच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. देशात सुमारे 6 टक्के मुलं आणि 2 टक्के प्रौढ लोक दम्याच्या समस्येने त्रस्त आहेत. तज्ज्ञांच्या मते दम्याची समस्या काही लोकांमध्ये अनुवांशिक असते तर काही लोकांमध्ये दमा वेगवेगळ्या कारणांमुळे वाढू (Asthma Tips) शकतो. दम्यामध्ये शरीराचे वायुमार्ग अरुंद होतात आणि फुगतात आणि त्यामुळे श्लेष्मा तयार होतो. अशा परिस्थितीत श्वास घेण्यास अडचण (Breathing Problems) निर्माण होते आणि खोकला येतो. रोजच्या आयुष्यात काही काळजी (Asthma Care) घेतली तर दम्याची समस्या दूर ठेवता येते. विशिष्ट औषध घेणे टाळा : काही लोक नॉन-स्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी औषधे घेतात. यामुळे देखील श्वासनलिकेत सूज येऊ शकते आणि दम्याची लक्षणे जाणवू शकतात. त्यामुळे कोणतेही औषध घेतल्यानंतर तुम्हाला श्वास घेण्यास समस्या जाणवत असेल तर ते औषध डॉक्टराच्या सल्ल्याने ताबडतोब बंद करा.

  चमचमीत Chole Bhature वर ताव मारताय तर सावधान! आधी हा Video जरूर पाहा

  धूम्रपान सोडा : धुम्रपानमुळे अस्थमासह श्वसनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तंबाखूच्या धुराच्या संपर्कात येणे टाळावे. तसेच लहान मुलांसमोर धूम्रपान करणे टाळावे. कारण यामुळे त्यांच्यात दम्याची लक्षणे वाढण्याचा धोका असतो. दम्याचा त्रास असलेल्यांनी धुम्रपान अजिबात करू नये. प्रक्रिया केलेले अन्न टाळा : आरोग्य तज्ञांनुसार काही जणांमध्ये प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्यानंतर दम्याचा झटका येण्याची समस्या दिसून आली. अशा पदार्थांमध्ये सल्फर डायऑक्साइड आणि सोडियम मेटाबायसल्फाईट सारखे पदार्थ असू शकतात आणि त्यामुळे दम्याचा त्रास जाणवू शकतो. अशा स्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्याने आहारात ताज्या हिरव्या भाज्या, कडधान्ये आणि फळांचा समावेश करावा.

  सहज उपलब्ध होणारी ही भाजी Diabetes रुग्णांसाठी आहे उपयोगी; शुगर कंट्रोलमध्ये राहील

  अ‍ॅलर्जीयुक्त घटकांपासून दूर राहा : अ‍ॅलर्जी निर्माण करणाऱ्या गोष्टी म्हणजेच धूळ, प्रदूषण यापासून दूर राहा आणि स्वत:ची काळजी घ्या. अशा गोष्टी श्वसनमार्गाद्वारे शरीरात गेल्याने जळजळ होते आणि दम्याचा झटका येऊ शकतो. त्यामुळे कुठेही बाहेर जाताना नाकाला मास्क लावा किंवा रुमाल बांधावा. यामुळे दम्याची समस्या दूर ठेवण्यास मदत होऊ शकते.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Health, Health Tips, Lifestyle

  पुढील बातम्या