Home /News /lifestyle /

सहज उपलब्ध होणारी ही भाजी Diabetes रुग्णांसाठी आहे उपयोगी; शुगर कंट्रोलमध्ये राहील

सहज उपलब्ध होणारी ही भाजी Diabetes रुग्णांसाठी आहे उपयोगी; शुगर कंट्रोलमध्ये राहील

रक्तातील साखरेची पातळी तपासणे -
हे जाणून आश्चर्य वाटेल की, सतत वजन वाढणे हे देखील मधुमेहाचे लक्षण असू शकते. वजन वाढण्यासोबतच तुम्हाला वारंवार टॉयलेटला जावं लागत असेल, तर तुमच्या रक्तातील साखर वाढली असण्याची शक्यता आहे. अशा प्रकरणात, आपण त्वरित रक्तातील साखरेची तपासणी केली पाहिजे.

रक्तातील साखरेची पातळी तपासणे - हे जाणून आश्चर्य वाटेल की, सतत वजन वाढणे हे देखील मधुमेहाचे लक्षण असू शकते. वजन वाढण्यासोबतच तुम्हाला वारंवार टॉयलेटला जावं लागत असेल, तर तुमच्या रक्तातील साखर वाढली असण्याची शक्यता आहे. अशा प्रकरणात, आपण त्वरित रक्तातील साखरेची तपासणी केली पाहिजे.

मधुमेहाच्या रुग्णांना (Diabetic Patient) गोड पदार्थ वर्ज्य करण्याचा सल्ला दिला जातो. आजपर्यंत या आजारावर ठोस उपचार सापडलेले नाहीत, पण सकस आहार घेतल्यास आपण निरोगी राहू शकतो.

    मुंबई, 16 जून : मधुमेहाचा आजार आता जगभरात सर्रास होत आहे. भारताला तर मधुमेहाची राजधानी म्हटले जाते, कारण आपल्याकडे अशा रुग्णांची संख्या करोडोंच्या घरात आहे. हा आजार एकदा कुणाला झाला की तो आयुष्यभर पिच्छा सोडत नाही. रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) नियंत्रित ठेवण्यासाठी नेहमी कसरत करावी लागते. अनेक गंभीर आजारही होण्याचा धोकाही त्यामुळे (Fenugreek Leaves For Diabetes) असतो. मधुमेहामध्ये सकस पदार्थ खा - मधुमेहाच्या रुग्णांना (Diabetic Patient) गोड पदार्थ वर्ज्य करण्याचा सल्ला दिला जातो. आजपर्यंत या आजारावर ठोस उपचार सापडलेले नाहीत, पण सकस आहार घेतल्यास आपण निरोगी राहू शकतो. मधुमेहाच्या रुग्णांसाठी मेथी गुणकारी - आज आपण मेथीविषयी जाणून घेऊया. मेथीची हिरवी पाने मधुमेहाच्या रुग्णांसाठी अतिशय गुणकारी मानली जातात. या पानांमध्ये प्रथिने, नैसर्गिक चरबी, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, लोह, फायबर, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, जस्त, व्हिटॅमिन सी, थायामिन, नियासिन, रिबोफ्लेविन, व्हिटॅमिन-बी6, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, फोलेट, एनर्जी, अँटिऑक्सिडंट, सेलेनियम असतात. दाहक-विरोधी आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म आढळतात. मधुमेहामध्ये मेथी आणि त्याची पाने खाण्याचे फायदे - मेथीच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर मेथीमध्ये विरघळणारे फायबर (Soluble Fiber) असते, ज्यामुळे साखर शोषण्याची प्रक्रिया मंदावते. मेथीचा वापर आपण मसाल्याशिवाय करू शकतो. हिरवी पाने कच्ची किंवा त्याची भाजी खाऊ शकता. मेथीचे नियमित सेवन केल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची (Bad Cholesterol) पातळी कमी होते, ज्यामुळे मधुमेहाचा धोकाही कमी होतो. हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा मेथीची पाने (Fenugreek Leaves) हृदयाच्या आरोग्यासाठी कोणत्याही आयुर्वेदिक औषधापेक्षा कमी नाहीत. मेथीचे पाणी (Fenugreek Water) रोज सकाळी प्यायल्यास वाढते वजन झपाट्याने कमी होते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Diabetes, Health, Health Tips

    पुढील बातम्या